मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या आवारात वृक्षारोपण…

मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम:शिवराजाभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज जयंती व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य* सावंतवाडी : मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने काल सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य व शिवराजाभिषेक सोहळा दिनांकनुसार, छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे व शिवराजाभिषेक सोहळा तिथीनुसार या सर्वांचे निमित्त साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.सध्या पर्यावरणाचा…

Read More

दीपक केसरकर सावंतवाडीच्या मूलभूत प्रश्नांवर सतत कोलांट्या मारतात…

रुपेश राऊळ यांची टीका:मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंमत देत नसतील, तर त्यांनी तसे जाहीर करावे… ⚡सावंतवाडी ता.१०-:नगराध्यक्ष, चार वेळा आमदार आणि काही काळ मंत्रीपद भूषवलेल्या, प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेले आमदार दीपक केसरकर आरोग्य, वीज वितरण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सतत कोलांट्या मारत असल्याने त्यांच्या हतबलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तर त्यांनी…

Read More

कणकवली तालुक्यातील दरड व पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार स्थलांतरित करा…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांना सूचना.. कणकवली : तालुक्यातील पावसाळ्याच्या कालावधीत पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आले असून या क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना सुरक्षित स्थळी वेळीच स्थलांतरित करावे अशा सूचना कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिल्या. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये पूरप्रवण क्षेत्र व दरड प्रवण क्षेत्रातील गावातील…

Read More

हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे केले लंपास..

कणकवली आठवडी बाजारातील घटना.. कणकवली : कणकवली चा आठवडा बाजार हा मंगळवारी असतो. मंगळवारच्या आठवडा बाजारा दिवशी दुपारी १:३० वा. च्या. दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे लंपास केले. मात्र यातील पर्स मधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या सोबत असलेल्या तिच्या मुलीने तात्काळ ही बाब निदर्शनास येताच तेथील असलेल्या…

Read More

कणकवली डीपी रोड नजीकच्या गटाराच्या चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नागरिकांनी घेतली धाव.. कणकवली : शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली. ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील काहींनी निदर्शनास आणली. त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करत ठेकेदार अनिल पवार यांच्या कर्मचाऱ्यांच्या…

Read More

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यासह ग्रामीण भागातील महिलांनी आज वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सुहासिनी महिलांनी वटवृक्षाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. या सणाला पावसाने हजेरी लावली नसल्याने महिला वर्गामध्ये आनंदी वातावरण पहायला मिळाले.वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे…

Read More

कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत…

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना:गेल्या सोळा वर्षांची परंपरा.. कुडाळ : गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन वृक्ष लागवडी ने साजरा…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या च्या २६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज तळेरे येथील ज्ञानवर्धिनी नर्सिंग कॉलेजमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. या मध्ये नारळ, पोफळी तसेच ऑक्सटर या झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा युवक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक, कणकवली विधानसभा अध्यक्षडॉ.अभिनंदन मालंडकर,जिल्हा चिटणीस सुधाकर करले, सुनील हरमलकर, गौरव…

Read More

मालवणात सहकारी संस्थांसाठी २१ रोजी कार्यशाळा…

⚡मालवण ता.०९-:‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’ निमित्त सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आणि मालवण तालुक्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ जून रोजी दैवज्ञ भवन येथे सहकारी संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सकाळी १० ते १०.१५ वा. प्रस्तावना, १०.१५ ते १०.३० दीपप्रज्वलन व स्वागत, १०.३० ते ११.३० वा. मालवण…

Read More

ग्राहक चळवळ वाढविण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आवश्यक…

अरुण वाघमारे:मालवणात ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न.. ⚡मालवण ता.०९-:ग्राहक हित जोपासण्याकरिता ग्राहकाला त्याचे हित आणि कायदा याची माहिती होण्यासाठी शाळा, कॉलेज स्तरावर शासनाकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. संघटनेच्यावतीने आम्ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी पुढाकार घेत आहोत. शासनानेही आम्हाला सहकार्य करून बंद खोलीतील कार्यक्रमांचे नियोजन करण्यापेक्षा सर्वसामान्य ग्राहकांना मार्गदर्शन होणारे कार्यक्रम आयोजित करावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्राहक…

Read More
You cannot copy content of this page