Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:कणकवलीत मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य यंत्रणेवर विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथे मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेत विविध…

Read Full News

तळवणे शाळेत मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.२७-: जि.प. प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ येथे “मराठी भाषा गौरव दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांच्या जयंती निमित्त आज तळवणे प्राथमिक शाळेत ” मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शिक्षक बापूशेट कोरगावकर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना…

Read Full News

साटेली येथील श्री देव कुळकार देवस्थान वर्धापन दिन २८ रोजी…

⚡सावंतवाडी ता.२७-: साटेली (तालुका सावंतवाडी )कातवडवाडी येथील श्री देव कुळकार देवस्थान चा वर्धापन दिन शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी साजरा होत असून ,देवस्थानस्थळी सकाळी पूजा ,अभिषेक ,दुपारी आरती ,तीर्थप्रसाद व महाप्रसाद तसेच रात्रौ ९:३० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे .तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साटेली कातवडवाडी आणि ग्रामस्थ यांनी…

Read Full News

आजगाव विद्या विहार येथील जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्पर्धेत माणगाव विद्यालय प्रथम,शिवाजी विद्यालय, पणदूर द्वितीय तर नेमळे हायस्कूल तृतीय.. ⚡सावंतवाडी ता.२७-: लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित ,विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव चे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या ३३ व्या स्मृतिदिना प्रित्यर्थ प्रशालेच्या वतीने जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला जिल्ह्यातून शाळांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून…

Read Full News

सावंतवाडी–दोडामार्गातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह घोषित झाल्याने पर्यावरण चळवळीचे मोठे यश…

डॉ. जयेंद्र परुळेकर:वृक्षतोडीवर तात्काळ लगाम लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी, ता.२७-: केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला मोठे यश मिळाले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी जैवविविधतेने नटलेल्या या परिसराचे संरक्षण या निर्णयामुळे अधिक सक्षम होईल, अशी आशा डॉ. जयेंद्र परुळेकर…

Read Full News

शहरातील विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही…

अँड.अनिल निरवडेकर:सावंतवाडी नगरपरिषदेचा १४९.९७ कोटींचा अर्थसंकल्प केला सादर.. ⚡सावंतवाडी, ता.२७-: शहरातील विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. निविदेतील अटींनुसार दर्जेदार काम न झाल्यास संबंधित ठेकेदारांचे पूर्ण बिल रोखण्यात येईल, असा ठाम इशारा सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दिला. सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे १४९ कोटी ९७ लाख २७ हजार ८७३…

Read Full News

“अर्थसंकल्प म्हणजे खेळणं आहे का..?

संजू परब: प्रभारी नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा केला प्रयत्न.. सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना सभागृहात चांगलीच खडाजंगी उडाली. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर विविध मुद्द्यांवर सवालांची सरबत्ती करत अर्थसंकल्पाच्या बजेटवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पातील काही तरतुदी व प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नसल्याचा आरोप करत परब आक्रमक…

Read Full News

इन्सुली–वेत्ये गावच्या विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील…

मनीष दळवी: रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, २० लाखांचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.२७-:वेत्ये गावाच्या विकासाठी जिल्हा बँकेचा अध्यक्ष या नात्याने आपण नेहमी प्रयत्नशील आहे. भविष्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मनीष दळवी यांनी वेत्ये येथे आज दिली.पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये या…

Read Full News

*एसटी प्रशासनाच्या विरोधातील उद्याचा संघर्ष अटळ…

माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा इशारा.. ⚡बांदा ता.२७-: बांदा व इन्सुली पंचक्रोशीतील सर्व लोकप्रतिनिधींचा पाठिंबा. गेली ३० वर्ष मळगाव सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुरू होऊन सावंतवाडी एसटी प्रशासनाने बांदा पंचक्रोशीतून एसटी फेऱ्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला नाही. बांदा व इन्सुली पंचक्रोशीतून सन २०१७ पासून एसटी सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जात होते परंतु एसटी प्रशासनाने…

Read Full News

बांदा विकास सोसायटीचे कर्जदार सभासदांनी तात्काळ केवायसी पूर्ण करावे…

राजाराम (बाळू) सावंत यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.२७-: बांदा विकास सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांनी तात्काळ आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून संबंधित सभासदांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.सहकार आयुक्त यांनी सहकारी संस्थांमधील व्यवहार…

Read Full News

You cannot copy content of this page