Headlines

हरकुळ बुद्रुक येथील श्री देव कोटेश्वराचा उद्या अखंड हरीनाम सप्ताह…

हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने दिंडी भजने व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.. कणकवली : हरकुळ बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्री देव कोटेश्वराचा अखंड हरीनाम सप्ताह उद्या दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरीनाम सप्ताह व शिमगोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. उद्या सकाळी १० वा घटस्थापना, सकाळी ११ ते ३:३०…

Read Full News

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

कणकवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली यांच्यावतीने रविवार ८ मार्च २०२६ रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे महिलांसाठीच्या स्पर्धा, उद्योगिनी पुरस्कार, मान्यवरांचा सन्मान आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर होणार आहेत. मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्यावतीने सलग कार्यक्रमाचे हे यंदाचे २४ वे वर्ष आहे. रविवार ८ मार्च २०२६ रोजी पाककला स्पर्धा…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीत उद्या भव्य मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प…

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपचार करून घेण्याचे आवाहन.. कणकवली : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘मल्टी’ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे….

Read Full News

देवगडमध्ये एकाच तलाठ्यावर १० गावांचा भार…

विलास साळसकर आक्रमक,उपोषणाचा इशारा.. ​ ⚡​देवगड ता.२६-:देवगड तालुक्यातील महसूली प्रशासनाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसत असून, मोंड सज्जाच्या तलाठ्यांकडे तब्बल १० गावांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन येत्या ४ दिवसांत मार्ग न निघाल्यास उपोषणाचा इशारा…

Read Full News

ओसरगाव टोल नाका येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न…

⚡कणकवली ता.२६-: ओसरगाव टोल नाका येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली मार्फत उपकेंद्र ओसरगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेज बहादुर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरेश्वर ढोके यांनी नियमित आरोग्य तपासणी केली….

Read Full News

निगुडे–सोनुर्ली मार्गावरील एसटी फेऱ्यांसाठी २८ फेब्रुवारीला उपोषण…

गुरुदास गवंडे:कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील.. ⚡बांदा ता.२६- निगुडे येथील माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशन–सोनुर्ली–निगुडे–बांदा व परतीच्या मार्गावर एसटी फेऱ्या सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत २८ फेब्रुवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. गवंडे यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रा.प.म.) कणकवली…

Read Full News

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत वराडकर हायस्कुल कट्टा चे नेत्रदीपक यश…

⚡मालवण ता.२६-:महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत (NMMS) कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत कुमारी. समीक्षा सुनील गावडे, कुमारी…

Read Full News

१२ कोटींच्या नगराध्यक्षांनी माझ्या भानगडीत पडू नये..

संजू परब यांचा पलटवार:सुट्टीवर असताना ऑनलाईन सभेला उपस्थिती कोणत्या नियमात?..? ⚡सावंतवाडी ता.२३- : नगराध्यक्ष मॅडमसुट्टीवर असताना ऑनलाईन सभेला उपस्थित राहणे हे कोणत्या नियमात बसते, हे आधी जाहीर करावे आणि त्यानंतर आमच्यावर टीका करावी, असा पलटवार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्यावर केला. ते म्हणाले, “सावंतवाडी नगरपालिकेत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा…

Read Full News

वैभववाडी नगरपंचायतीला ३ कोटी २५ लाखांचा विकासनिधी मंजूर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्ते, पथदीप, गटारे व सुशोभीकरणाची कामे मार्गी; नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांची माहिती.. ⚡वैभववाडी ता.२६-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला नगरोत्थान मधून 3 कोटी 25 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत . या भरघोस निधीतून वैभववाडी शहरातील विविध विकास कामे केली जाणार आहेत.रस्ते, पथदीप, सुशोभीकरण, बंदिस्त गटारे…

Read Full News

वेंगुर्ला – परुळेबाजार ग्रामपंचायतीचा बेलापूर येथे पुरस्कार देऊन विशेष सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.२५-:संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग 2 वर्षे पुरस्कार प्राप्त करणार्‍या वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतचा आज बुधवारी (25 फेब्रुवारी ) कोकण विभागाच्या बेलापूर येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त माणिक दिवे, सहाय्यक अप्पर आयुक्त प्रदीप घोरपडे, सिडकोचे व्यवस्थापक राजाराम दिघे आदी…

Read Full News

You cannot copy content of this page