स्मार्ट मीटर नेटवर्कअभावी ‘शून्य रीडिंग’वर ८० हजारांचे बिल…

उपसभापती गौरव मुळीक यांनी सभेत धक्कादायक प्रकार आणला समोर: रिक्त पदे, आरोग्य, रस्ते व अपघात प्रश्नांवरही सदस्य आक्रमक..

⚡सावंतवाडी ता.२३-: स्मार्ट मीटरच्या नेटवर्क अभावी शून्य रीडिंग पडलेल्या तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचे बिल विज वितरणकडून तब्बल ८० हजार रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी आज सभागृहासमोर आणला. माझे फिल्ड सुद्धा इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे उगाचच आम्हाला बोलायला भाग पाडू नका या प्रश्नावर वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घ्या अन्यथा यापुढे असे प्रकार आम्ही सहन करणार नाही असा इशारांचाच त्याने वीज वितरण चे उपअभियंता निलेश राक्षे यांना दिला. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या विजेच्या प्रश्नावर योग्य नियोजन करून त्या त्या भागातील कामे आत्ताच मार्गी लावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

   सावंतवाडी तालुका पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती सुष्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर उपसभापती श्री मुळीक प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते. सर्व सदस्यांनी हजेरी लावली होती.यावेळी झालेल्या विभागवार आढाव्यामध्ये उपस्थित पंचायत समिती सदस्यांनी अधिकारी वर्गांना अनेक मुद्द्यावरून कात्रित पकडले. सावंतवाडी पंचायत समितीला दोन विस्तार अधिकारी पदे मंजूर असताना त्यातील एक विस्तार अधिकारी पद हे रिक्त झाले आहे मात्र अन्य एक का पदावरील अधिकारी प्रतिनियुक्तीने अन्य जिल्ह्यात काम करत आहे मात्र पगार त्यांना या ठिकाणचा मिळत आहे. मात्र या ठिकाणच्या कामाचा लोड अन्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून एकतर त्या पदावरील व्यक्तीची रितसर बदली करा आणि त्या रिक्त जागेवर नव्याने अधिकारी येण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा अशी मागणी केली यावेळी सर्वच सदस्यांनी या विषयाला विसरून धरत तशा प्रकारचा ठरावच सभागृहात मांडला तो सर्वांनी मध्ये मंजूर करण्यात आला. तर या संदर्भात आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे लक्ष वेधले आहे तशा प्रकारचा पत्रव्यवहारही आपण त्यांच्याकडे केला आहे लवकरच रिक्त जागी नव्याने अधिकारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे उपसभापती गौरव मुळीक यांनी सभागृहात सांगितले. 
   सावंतवाडी तालुक्यात 11 माकड्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र माकड तापाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. माकड तापाचे  ५ रुग्ण मिळाले होते, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आल्यानंतर उपचार करण्यात आले असून ते आता ठीक आहेत. असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आंबोली येथे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अडचण निर्माण होते त्यामुळे त्या ठिकाणी सफाई कामगारांची रिक्त पदे भरा तसेच त्या ठिकाणचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे एमबीबीएस द्या अन्यथा आम्हाला उपोषणासारखा मार्ग हाती व्हावा लागेल अशा सूचना सदस्य मायकल डिसोजा यांनी केले तर औषधांच्या तुटवड्याबाबत उपसभापती श्री मुळीक यांनी नाराजी व्यक्त करत सुचना दिल्या.
  न्हावेली गावासाठी  स्मशानभूमीकडे रस्ता नसल्याने अडचण निर्माण होत आहे त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा त्या ठिकाणी नेमके काय अडचणी आहेत ते शोधा अशा सूचना सदस्य शरद धाऊसकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तर सोनुर्ली आरोस तिठ्यावर गतिरोधक नसल्याने अपघातासारखे प्रकार घडत आहे त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधकाची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी पावले उचला अशी मागणी त्यांनी केली. तर केसरी दारुड्याचा बंधारा या कामावरून सदस्य प्रशांत सुकी जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
You cannot copy content of this page