Headlines

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा कोकणचा विकासपथ ठरेल…

प्रभाकर सावंत:सिंधू रत्न समृद्धी योजना पुढील तीन वर्षासाठी कायम करण्यात असल्याने जिल्ह्याला मोठा फायदा होणार.. ⚡ओरोस ता ७-: सर्व घटकांना समावेश करणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या हा अर्थसंकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कित्येक वर्षापासून सुरू असलेली सिंधू…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ते २२ मार्च दरम्यान ‘जलमहोत्सव’…

⚡ओरोस ता ७-: ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात ८ ते २२ मार्च पर्यत जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार, महसुल गाव कर्ली येथे केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री व्ही. सोमान्ना, पेयजल व स्वच्छता विभाग,…

Read Full News

‘हाती झाडू अन् मनी ध्यास’; सुधाताई कामत विद्यामंदिराच्या बालचमूंनी घुमविला स्वच्छतेचा जागर…

⚡सावंतवाडी ता.०७-: “देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, गरिबांना जेवू घाला आणि स्वच्छता पाळा,” असा रोकठोक संदेश देणारे आधुनिक युगातील महान संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून, पी.एम. श्री कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (सावंतवाडी नं. २) येथे ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या चिमुकल्यांनी…

Read Full News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…

⚡ओरोस ता ७-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मा. डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम जिल्हा न्यायाधीश–१…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मणक्याची मोफत तपासणी शिबिर संपन्न…

१८० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ.. कणकवली : ग्रामीण भागातील रुग्णांच्या मणक्याशी संबंधित आजारांचे निदान व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने ‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’, कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मणक्याची मोफत तपासणी शिबिर आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे संपन्न झाले. या शिबिरात १८० पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी करून…

Read Full News

देवदूताच्या रूपाने धावला १०२ रुग्णवाहिकेचा चालक…

मळेवाड येथील घटना:तत्काळ घटनास्थळी दाखल होत चिरेखाणीतील गर्भवती मातेचे वाचवले प्राण.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आजगाव मळेवाड सीमेवरील एका भागात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना घडली.दुर्गम भाग, रस्ता नसलेले जंगल आणि रात्रीचे १० वा.चा सुमार.त्यात वेळेचे आणि खडतर प्रवासाचे आव्हान! अशा कठीण परिस्थितीत मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेचे चालक शंकर पार्सेकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे, एका ८…

Read Full News

डेरवण युथ गेम्स 2026 बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व…

⚡सावंतवाडी ता.०७-: डेरवण, चिपळूण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने आयोजित केलेल्या सोळा वर्षाखालील राज्यस्तरीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील एकशे सहा विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. गेली बारा वर्षे एस.व्ही.जे.सी.ट्रस्टतर्फे बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी मागील नऊ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके…

Read Full News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालवणमध्ये कथावाचन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद …

⚡मालवण ता.०७-:मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कथावाचन कार्यक्रमाला श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला प्रारंभी साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थना सादर करण्यात आल्यानंतर मराठी गौरव गीत सादर केले गेले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ साहित्यिक श्रीमती…

Read Full News

आसोलीच्या मुख्याध्यापिका वैभवी रायशिरोडकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

⚡बांदा ता.०७-: वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सावंतवाडी येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सावंतवाडी येथील सावंतवाडी राजवाडा येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र, सिंधुदुर्ग यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. माजी…

Read Full News

*वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून होणारे नुकसान थांबवा…

नरेश देऊलकर: वनविभागाला निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आरोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी आरोंदा पंचक्रोशीत सध्या जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान बाबत वनविभागाला निवेदन देत तत्काळ यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत व त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आरोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर यांनी निवेदन…

Read Full News

You cannot copy content of this page