कणकवली महसूल विभागाची स्वगणना प्रक्रिया यशस्वी…

१०३ अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सहभाग:कामकाज अधिक पारदर्शक होण्यास मदत..

⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील महसूल विभागातील एकूण १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वगणना प्रक्रिया तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रक्रियेत ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांचा सक्रिय सहभाग होता.

शासनाच्या निर्देशानुसार ही स्वगणना प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत आपली माहिती अचूकपणे सादर केल्यामुळे विभागीय कामकाज अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या उपक्रमात कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून महसूल विभागाने प्रशासनातील कार्यक्षमतेकडे एक सकारात्मक पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

You cannot copy content of this page