Headlines

वेंगुर्ला तालुक्याच्या विकासाभिमुख काम करा ; खा. नारायण राणे…

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य (9) यांनी खा. नारायण राणे यांची आज शुक्रवारी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. निवडणुकीतील विजयानंतर ही भेट घेण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, रेडी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण…

Read Full News

मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.०६-: मुंबई शहरातील सुमारे १६० वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या जीएसबी टेम्पल ट्रस्ट, मुंबईच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व समाधान व्यक्त होत आहे.मुंबई शहरातील अनेक ऐतिहासिक व श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांचे व्यवस्थापन आणि देखरेख जीएसबी टेम्पल ट्रस्टकडून केली जाते. वाळकेश्वर-बाणगंगा परिसरातील…

Read Full News

अर्थसंकल्प दिलासादायक तरीही आंबा -काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय अपेक्षित-:श्री. एम. के. गावडे…

⚡वेंगुर्ला ता.०६-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी सादर केलेला अर्थसंकल्प दिलासादायक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलेला निर्णय स्वागतारह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव तथा कृषिभूषण एम. के. गावडे यांनी दिली. श्री. गावडे म्हणाले, आज शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बांधकाम व रस्ते याबाबतीत निधीची तरतूद आवश्यक असली तरी आंबा – काजू उत्पादक शेतकरी…

Read Full News

चौके हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती…

⚡मालवण ता.०६-:ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेतर्फे चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती शिष्यवृत्ती’ देण्यात आली. त्यांच्या खात्यावर ही रक्कम प्रदान करण्यात आली. ग्लोबल फाऊंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती अंतर्गत रक्कम प्रदान करण्यात येते. विद्यालयातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा शैक्षणिक प्रगतीमध्ये फायदा झाला आहे. यावर्षी विद्यालयातील…

Read Full News

मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा. सुमेधा नाईक प्रथम…

मालवण रोटरी क्लबचे आयोजन.. ⚡मालवण ता.०६-:मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब मालवण तर्फे घेण्यात आलेल्या १८ वर्षावरील व्यक्तींसाठी मराठी शुद्धलेखन स्पर्धेत प्रा.सुमेधा नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत गौरी पाटकर यांनी द्वितीय, डॉ.रुपाली पंतवालावलकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला, तर उत्तेजनार्थ म्हणून अस्मिता रावराणे व…

Read Full News

मालवणात ८ मार्च रोजी महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा…

⚡मालवण ता.०६-:ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर -शंकरदास यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन २०२६ – रन फॉर हेल्थ या स्पर्धेचे आयोजन दि. ८ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त महिलांसाठी आहे….

Read Full News

भगवंतगड आचरा रस्ता कामाच्या दिरंगाईबाबत चिंदर ग्रामस्थ आक्रमक…

चिंदर ग्रामपंचायतीतर्फे आंदोलनाचा इशारा.. ⚡मालवण ता.०६-:भगवंतगड आचरा रस्ता कामाच्या दिरंगाईबाबत चिंदर ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या चार दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा चिंदर ग्रामपंचायत तर्फे बांधकाम कार्यकारी अभियंता यांना मेलद्वारे देण्यात आला आहे आचरा चिंदर भगवंतगड बांदिवडेकडे जाण्यासाठी असलेल्या चिंदर भगवंतगड रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले…

Read Full News

महा ई सेवा व आधार केंद्र चालकांचे ९ मार्चला आझाद मैदानावर धरणे आंदोलन…

⚡मालवण ता.०६-:राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. ९ मार्च रोजी आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या संदर्भात संस्थेकडून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खरात, राज्य प्रतिनिधी संदेश…

Read Full News

मालवणच्या भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालयात पारंपारिक शिवजयंती उत्सव साजरा…

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवशंभू विचारमंच सिंधुदुर्ग’चे संयोजक तसेच ‘शिवराज भूषण’नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर केले. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा तसेच सरस्वती माता…

Read Full News

अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी…

मालवण ता.०६-:वायंगणी दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी तिचे नातेवाईक तथा माजी पं. स. सदस्य उदय राजाराम दुखंडे यांनी मालवण पोलीस ठाण्याकडे केली आहे. सौ. अंतरा दुखंडे या २२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. २४ फेब्रुवारी रोजी कालावल पुलाखाली झाडीत त्यांचा…

Read Full News

You cannot copy content of this page