⚡वेंगुर्ला ता.०३-:
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांना
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य नीलेश परब यांनी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा भेट देऊन नेत्याचा आदर केला. त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कृतीचे सावंतवाडी तालुक्यातून कौतुक करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडी नगराध्यक्ष श्रध्दा भोसले, लखरामराजे भोसले, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गावसं आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
पत्रकार सन्मान कार्यक्रमात मंत्र्यांचा ग्रामीण पत्रकाराकडून असाही सन्मान…
