⚡वेंगुर्ला ता.०३-: तालुक्यातील मठ श्री देव बादेश्वर मंदिर नजीक वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांवर आज रविवारी सकाळीच एका कारला अपघात होऊन कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर कार विद्युत पोलवर आदळल्याने नुकसान झाले आहे. गोव्याहून वेंगुर्ला कुडाळ देवगडकडे जाणाऱ्या या कारला चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. सुदैवाने कारमधील चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मागील काही दिवसात मठकरवाडी येथे अपघात होऊन देवगड येथील एका युवकाचा मृत्यू झाला होता. तर यावेळी मठ ठाकूरवाडी येथील एक युवक जखमी झाला होता. दरम्यान याच मार्गांनजिक गेल्या चार दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साईडपट्टीचे काम सुरु आहे. याबाबत संपूर्ण चार किमी क्षेत्रात कारचालकानी वाहने सावकाश हाकावीत व संबंधित पीडब्लूडी व एमईसीबी या दोन्ही विभागानी तातडीने 15 मे पूर्वी सुस्थितीत ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनधारकातुन करण्यात आली आहे.
मठ येथे कारला अपघात ; कारचे मोठे नुकसान…
