⚡वेंगुर्ले ता.०२-: तालुक्यातील रेडी हुडावाडी येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूलाच वळणावर धोकादायक स्थितीत लोखंडी विद्युत पोल पूर्णतः गंजून गेल्याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच ,संबंधित विभागाला जाग येत तो गंजलेल्या स्थितीत असलेला लोखंडी विद्युत पोल बदलला.
सदरील गंजलेल्या स्थितीतील तो लोखंडी पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती.
भर वस्तीत आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच असलेल्या या पोलामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.
या रस्त्यावरून बऱ्याच पर्यटकांचीसुद्धा सतत ये- जा असल्यामुळे .संबंधित विभागाने तत्काळ सदरील पोल बदलून पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत होती.
सदरील घटनेची संबंधित विभागाने दखल घेत त्या जागी नवीन पोल उभारत्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
रेडी हुडावाडी येथील “तो” धोकादायक लोखंडी विद्युत पोल अखेर बदलला…
