भेडशी कॉलेजची वाणिज्य शाखेतून सोनिया गवस अव्वल..
⚡दोडामार्ग ता.०२-: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (फेब्रुवारी 2026) परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, दोडामार्ग तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल यंदा 93 टक्के लागला असून, एकूण 155 विद्यार्थ्यांपैकी 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी संचित सुभाष परब याने 87.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात सर्व शाखांमधून प्रथम क्रमांक पटकावला.
विज्ञान शाखेत अनया संतोष गवस (75.33%) हिने प्रथम (तालुक्यात द्वितीय), अभिषेक कृष्णा तळणकर (71%) द्वितीय (तालुक्यात तृतीय), तर श्रेया तानाजी दळवी (66.17%) तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेत सिद्धेश श्रीधर सावंत (77.17%) प्रथम (तालुक्यात प्रथम), सिद्धी संतोष गवस (68.17%) द्वितीय (तालुक्यात द्वितीय), तर सेजल शिवानंद प्रभावळकर (64.33%) तृतीय (तालुक्यात तृतीय) ठरली.
वाणिज्य शाखेत संचित सुभाष परब (87.33%) प्रथम, अतुल शिवराम मोर्लेकर (74.83%) द्वितीय, तर अनुज शिवराम मोर्लेकर (69%) तृतीय क्रमांकावर राहिले.
दरम्यान, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी कॉलेजनेही समाधानकारक यश मिळवले. कॉलेजमधून 41 विद्यार्थ्यांपैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेत सोनिया अर्जुन गवस हिने 85.83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या सगुण नाईक (76.50%) द्वितीय, तर तन्मय रमेश लोंढे (72.50%) तृतीय ठरला.
कला शाखेत आकांशा काशिनाथ च्यारी (54.83%) प्रथम, सिया चंद्रकांत नाईक (52.17%) द्वितीय, तर रोशन सखाराम देसाई (51.50%) तृतीय क्रमांकावर राहिले.
या यशाबद्दल दोन्ही संस्थांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शिक्षकवर्ग तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
