बाळकृष्ण पेडणेकर वास्को, गोवा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत “टाॅप टेन”मध्ये…

⚡सावंतवाडी ता.०५-: मार्मागोवा तालुका चेस असोसिएशनने वास्को, गोवा येथे कै.वेंकटेश आणि सुमती शानभाग यांच्या स्मरणार्थ पाचव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टाॅपचा खेळाडू सावंतवाडीचा बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने नववा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे छप्पन खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, विघ्नेश अंबापूरकर, वेदांत डांगी यांच्यासह दर्श सावंत या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.
या स्पर्धेत बाळकृष्णने नऊ राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून सात गुण केले आणि नववा क्रमांक मिळवला. बाळकृष्णने आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये बारा गुणांची वाढ केली. तेरा वर्षीय हर्ष राऊळ याने चमकदार कामगिरी करत पाच राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेपाच गुण केले. आठ वर्षीय विघ्नेश अंबापूरकर याने चांगला खेळ करुन तीन राऊंड्स जिंकून आणि तीन राऊंड्स बरोबरीत सोडवून साडेचार गुण केले. बारा वर्षीय वेदांत डांगी याने तीन राऊंड्स जिंकून आणि एक राऊंड बरोबरीत सोडवून साडेतीन गुण केले. दर्श सावंत याने राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन चार राऊंड्स जिंकून चार गुणांची कमाई केली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page