“कुडाळ येथे १० मे रोजी ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन…

⚡सिंधुदुर्ग दि.०५-: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ चे कुडाळ येथे रविवार दी १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५.०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी व प्राणी प्रेमी उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर,विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून,कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन,पर्यटन विकास, हवामान बदल यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.याशिवाय वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, पर्यावरण जनजागृती उपक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि पर्यावरणप्रेमींचा सन्मान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पर्यावरण विषयक मार्गदर्शन, विशेष अतिथींची भाषणे आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून सकारात्मक बदल घडवून आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
या संमेलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page