मळगाव-मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज

गावची ‘मांजरी’ उठल्याने धार्मिक कार्यांना पुन्हा सुरुवात *💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव गावची ‘मांजरी’ आज पहाटे उठली असून तीन दिवस बंद असलेल्या धार्मिक कार्यांना आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे.आज मळगाव येथील जागृत श्री देवी मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव होत आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी, दुपारी…

Read More

सावंतवाडी भाजी मार्केटमधील व्यापारी पालिकेने आखून दिलेल्या जागेत बसल्याने समाधान

सावंतवाडी दि.१८-:* भाजी मार्केट मधील सर्व व्यापारी आज पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाने आखून दिलेल्या जागेत बसून व्यापार करत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी काही व्यापारी बाहेर बसल्यानंतर बाजारपेठेत वाद झाला होता. परंतु आज सर्व व्यापारी नेमून दिलेल्या जागेत बसले आहेत.

Read More

परबवाडा येथे महिलांना व मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

*💫वेंगुर्ला दि.१८-:* गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळावे व मासिक पाळी काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती मिळावी या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘सबला‘‘ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्ग झोनचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरीयन…

Read More

सावंतवाडी शहरात महिलेची आत्महत्या

*💫सावंतवाडी दि.१८-:* शहरातील विठ्ठल मंदिर जवळ सौ. दिपाली शिंदे हिने राहत्या घरात आज सकाळी ७:३० च्या दरम्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु ही आत्महत्या का करण्यात आली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही आहे.

Read More

आत्मनिर्भर भारताच्या योजनेतून सावंतवाडीत महिला बचत गटांच्या माध्यमातून न्याहारी केंद्र सुरू…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *💫सावंतवाडी दि.१८-:* येथील चिटणीस नाका परिसरातील बापुसाहेब महाराज यांच्या पुतळ्या समोरील पाणपोईच्या जागेत सिद्धकला महिला बचतगट यांच्या घरगुती कोकणी न्याहारी केंद्राचे उद्घाटन सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांनी ही जागा त्यांना उपलब्ध…

Read More

अखेर रस्त्यावरील तो खड्डा बुजवला

नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी स्वतः बुजवला खड्डा *💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील शिरोडा नाका परिसरातील मोर्य यांच्या घरा समोरच खड्डा पडला होता. हा खड्डा बुजवण्यात यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्याला गेले १५ दिवस तक्रार करून देखील त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अखेर तो रस्त्यावरील खड्डा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी स्वतः रस्त्यावर उतरत…

Read More

ब्रेक फेल झाल्याने रेडी हुडा येथील वळणार डंपर पलटी होऊन अपघात

चालकाला किरकोळ दुखापत : मोठा अनर्थ टळला *💫वेंगुर्ला दि.१७-:* ब्रेक फेल झाल्याने रेडी हुडा येथील अवजड वळणार आज सायंकाळी डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र त्या ठिकाणी पादचारी व अन्य गाड्या नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेडी येथील संजू नागोळकर यांचा एम.एच.०७ सी.६८३६ या क्रमांकाचा डंपर घेऊन आरोंदा येथून रेडी…

Read More

परीट समाजाच्या वतीने सावंतवाडीत होणार श्री संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी

परीट समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज हा सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरात वटसावित्री हॉल खासकिलवाडा येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी रविवारी २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड मुळे ही पुण्यतिथी अतिशय साध्या पद्धतीत साजरी होणार आहे. यावेळी श्री संत गाडगेबाबा…

Read More

*स्वच्छता सर्वेक्षण २०२१ अंतर्गत समाज मंदिर परिसरात नगरपालिकेकडून जनजागृती

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८, समाज मंदिर परिसरात सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी कार्यक्रमावेळी जमलेल्या लोकांना याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी येथे जमलेल्या युवकांना केले आहे. तसेच घरगुती…

Read More

जिल्ह्यात एकूण 5 हजार 189 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 348; जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 189 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 348रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page