*स्वच्छता सर्वेक्षण २०२१ अंतर्गत समाज मंदिर परिसरात नगरपालिकेकडून जनजागृती

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८, समाज मंदिर परिसरात सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी कार्यक्रमावेळी जमलेल्या लोकांना याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी येथे जमलेल्या युवकांना केले आहे. तसेच घरगुती कचऱ्यापासून कशाप्रकारे खत निर्माण करू शकतो याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी नगरसेविका सौ. माधुरी वाडकर, नगरसेविका सौ भारती मोरे तसेच नगरपालिकेचे कर्मचारी वर्ग व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page