परीट समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांचे आवाहन
*💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज हा सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरात वटसावित्री हॉल खासकिलवाडा येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी रविवारी २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड मुळे ही पुण्यतिथी अतिशय साध्या पद्धतीत साजरी होणार आहे. यावेळी श्री संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे त्या दिवशी सकाळी ७ वाजता साफसफाई करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता श्री संत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीर रुग्णालयात फळे व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पुण्यतिथी साध्या पद्धतीत होणार असून परीट समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, व तालुका सरचिटणीस योगेश आरोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
