⚡वेंगुर्ला ता.१०-: आज जग गतिमान झाले असून जीवन सुखकर करावयाचे असेल तर विज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करून प्रगती साधणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचे कलात्मक गुण विकसित होत असतात. विज्ञानात संधी भरपूर असणार असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून बुद्धीला चालना देऊन आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे आदर्श घेऊन अध्ययन करावे, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी आज बुधवारी सायंकाळी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला रा. कृ.पाटकर हायस्कूल येथे ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 9 व 10 रोजी संपन्न झाले. यावेळी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात श्री. गोसावी अध्यक्षस्थानी बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक सुशांत धुरी, परीक्षक विरधवल परब व वनस्पती शास्त्रज्ञ् डॉ. धनश्री पाटील, विज्ञान मंडळाचे श्री. चव्हाण, मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष किशोर सोनसुरकर, निबंध स्पर्धेचे परीक्षक श्री. बोडेकर, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक श्री. तांबे, शिक्षण विभागाचे श्री. कुंभार, अन्य शिक्षक उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शन मध्ये उच्च प्राथमिक गट (शाळा विद्यार्थी प्रतिकृती) मध्ये वेतोरे केंद्रशाळा नं. 1 ने प्रथम क्रमांक पटकावीला. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (शाळा विद्यार्थी प्रतिकृती ) मध्ये अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे हायस्कुल ने प्रथम क्रमांक पटकावीला. यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा खरात व आभार विलास गोसावी यांनी मानले.या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणास विद्यार्थी, शिक्षणाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. दोन दिवसात निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व प्रतिकृती मांडणी (प्राथमिक गट / माध्यमिक गट) मध्ये तालुक्यातील प्राथमिक गटाच्या ४३ व माध्यमिक गटाच्या १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विज्ञान प्रदर्शनातील विजेते पुढीलप्रमाणे :
*निबंध स्पर्धा (प्राथमिक विभाग): प्रथम वैष्णवी सहदेव मुननकर( स.का. पशिल विद्यामंदिर, केळूस),
द्वितीय एकादशी बाळा परब ( विद्यामंदिर परुळे(,
तृतीय निहाली वैभव कुबल (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ).निबंध स्पर्धा (माध्यमिक गट) :प्रथम अस्मिता गंगाराम कुंभार (परुळे हायस्कुल), द्वितीय मानसी मोहन वराडकर (श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे), तृतीय वैभवी सुदेश चिचकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा).वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक गट) : प्रथम श्रुती दिनार मराठे (मठ शाळा नं. 2), द्वितीय मानसी योगेश शेट्ये ( स. का. पाटील विद्यामंदिर, केळूस ), तृतीय
प्रांजल लिलाधर परुळेकर – (विद्यामंदिर परुळे).
वक्तृत्व स्पर्धा (माध्यामिक गट :
प्रथम श्रावणी राजन आरावंदेकर(वेतोरे हायस्कूल), द्वितीय
दिक्षिता रोहन मातोंडकर ( मातोंड हायस्कुल), तृतीय सोहम संजय अणसूरकर ( अणसूर हायस्कूल) .
प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक गट) : प्रथम
श्रीनिवास बाबुराव मयेकर व अंकुर वामन गावडे (वेंगुली नं. 3). द्वितीय स्नेहा महादेव सावंत व दिशा आनंद गोगटे ( केंद्रशाळा- वेतारे नं. १).तृतीय
संस्कृती सुदेश चिपकर व गाथा दत्ताराम कोळमकर( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा).
प्रश्नमंजुषा स्वर्धा (माध्यमिक गट) : प्रथम
दिक्षिता रोहन मातोंडकर व काजल दिलीप परब (न्यू इंग्लिश स्कुल मातोंड ). द्वितीय किर्ती विजय कुंभार व मयुरी महेश गावडे (वेतारे हायस्कूल). तृतीय अर्वतिका अमेय देसाई व विशाखा प्रभू पंचलिंग ( विद्यामंदिर परुळे).
प्राथमिक गट – दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती (सहभागी-1) प्रथम
गौरांग अमित केरकर – (जि.प. पू. प्रा. शाळा वेतारे नं. १).
माध्यमिक : दिव्यांग विद्यार्थी -प्रतिकृती.
Klatan लुईस अराऊज (जी. डी. एन. कॉलेज वेतीरे).
उच्च प्राथमिक गट –
(शाळा- विद्यार्थी प्रतिकृती)
प्रथम दिशा आनंद गोगटे(वेतोरे केंद्रशाळा नं. 1).
द्वितीय रूद्र सुनिल माठ्ये
( विद्यामंदीर परुळे). तृतीय
समर्थ संतोष चोपडेकर
( जि.प. शाळा मोचेमाड). माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (शाला- विद्यार्थी प्रतिकृती): प्रथम अथर्व सुनिल मेस्त्री (अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे). द्वितीय
लक्ष्मी सिध्देश गावडे ( न्यू इंग्लिश स्कुल उभादोडा).
तृतीय अक्षरा देवेंद्र शिरोडकर (न्यू, इंग्लिश स्कूल, मातोंड हायस्कुल).
प्राथमिक अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य गट (प्राथमिक शिक्षक) प्रथम अर्चना रामचंद्र कोरगावकर( केंद्रशाळा वेतोरे नं. १). द्वितीय प्रशांत भालचंद्र चिष्कर( जि.प. पू. प्रा.शाळा दाभोली ने. 2).तृतीय श्रीम. शिल्या भारत मेश्राम (जि.प.पू. प्रा. शाळा, वजराट नं.१).
माध्यमिक अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य गट (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक) :प्रथम चैतन्य महादेव सुकी (श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे). द्वितीय किशोर शांताराम सोनसुरकर (दाभोली हायस्कुल).इत्यादीना गौरविण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण वेळी केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
