⚡मालवण ता.१०-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी मंडळ निवड प्रक्रियेमध्ये विज्ञान विभागाचा विद्यार्थी सर्वेश महेंद्र राणे याची जनरल सेक्रेटरी (GS) पदी निवड झाली.
या निवडीबद्दल स. का. पाटील महाविद्यालय, विज्ञान विभाग, सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग व कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वेश राणे याचे अभिनंदन करण्यात आले.
