परबवाडा येथे महिलांना व मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

*💫वेंगुर्ला दि.१८-:* गावातील महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळावे व मासिक पाळी काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याची माहिती मिळावी या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘सबला‘‘ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्ग झोनचे असिस्टंट गव्हर्नर रोटेरीयन प्रणय तेली, झोनल रोटरॅक्ट रिप्रझेंनटेटिव्ह स्वप्निल परब, प्रमुख वक्ते म्हणून होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या डॉ.पूजा कर्पे, सरपंच पपू परब, उपसरपंच संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सखी पवार, ग्लानेस फर्नांडिस, अर्चना परब, कृतिका साटेलकर, संजय मळगावकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे क्लब अॅडव्हाझर नितीन कुलकर्णी, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट अभिषेक साळगावकर, सेक्रेटरी निहार साळगावकर, इव्हेंट चेअरमेन साहिली निनावे, नेहा गावडे, प्रितीश लाड, शुभम हुले, रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्रेसिडेंट निहाल नाईक, व्हाईस प्रेसिडेंट दुर्गेश पाटील, इनरव्हिल क्लबच्या प्रसिडेंट गौरी मराठे, पास्ट प्रेसिडेंट वृंदा गवंडळकर, माजी उपसरपंच संजय मळगावकर, माजी सभापती सारिका काळसेकर, आरोग्य सेविका आंबेरकर, ग्रामसंघ अध्यक्ष नयना सावंत, सचिव दर्शना परब, गौरी सावंत व अॅना डिसोझा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राजेश घाटवळ, डॉ.वसंतराव पाटोळे, दादा साळगावकर व सीमा नाईक यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत परबवाडाचे कर्मचारी राजा परब व सिद्धेश कापडोसकर यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page