इतिहास विषय वाचनापेक्षा समजून घेणे गरजेचे-:शिवराज गायकवाड
*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-:* स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करताना वाचनापेक्षा समजून घेण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन दोडामार्ग नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी केले. इतिहासातील घटना, सामाजिक, राजकीय व्यवस्था यांचा टप्प्या-टप्प्याने अभ्यास करावा, जेणेकरुन लक्षात ठेवणे सोयीस्कर होईल असेही श्री. गायकवाड म्हणाले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज स्पर्धा परीक्षांविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी…
