प्रशासनाचे पुन्हा लेखी आश्वासन

कळणे मायनिंग नुकसानी प्रकरण;आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

*⚡सावंतवाडी ता.१३-:* कळणे खनिज प्रकल्प दुर्घटना होऊन तीन महिन्याच्या वर कालावधी उलटला असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. ५० टक्के भरपाई देतो असे सांगून केवळ तुटपुंजी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या विरोधात आज कळणे येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू केले होते. यावेळी प्रशासनाने नुकसान भरपाई मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता.

You cannot copy content of this page