Headlines

काँग्रेसकडून १३६ वा वर्धापनदिन साजरा…

देवगड ता.२८-:* अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला १३६ वर्ष पूर्ण होऊन १३७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा .त्या अनुषंगाने देवगड तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने देवगड तालुका अध्यक्ष कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेस चा हात निशाणीचा तिरंगा फडकवून राष्ट्रीय काँग्रेस…

Read More

जिल्ह्यातील भाजपा अंतर्गत घडामोडींना वेग

कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त *⚡कणकवली ता.२८-:* शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नीतेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे.यापार्श्वभूमीवर कणकवलीत राजकीय नाट्य घडामोडी घडत आहेत. त्यामुळे कणकवली शहरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून सुनावणीकडे राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तर…

Read More

युवा पिढीने विकासासाठी कोविआची पताका खांद्यावर घ्यावी:मोहन केळुसकर

कणकवली 28 डिसेंबर (प्रतिनिधी)-कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सामाजिक चळवळीतून गेले ४३ वर्षें संघर्ष करीत आलो आहोत. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या कामांमध्यै कधीही पक्षभेद विसरून संघटितपणे प्रयत्न केले नाही. त्यामुळे विकास कामांचा बट्टाबोळ झाला आहे. त्यामुळे कोकणचे नंदनवन निर्माण करायचे असेल तर कोकणातील सामाजिक भान असलेल्या युवा पिढीने आता कोविआची पताका खांद्यावर घ्यावी, असे आवाहन कोकण…

Read More

असलदे रामेश्वर विकास सोसायटी चेअरमनपदी भगवान लोके बिनविरोध

व्हाईस चेअरमनपदी दयानंद हडकर ;पक्षविरहित सहकार विकास पॅनेल म्हणून काम करणार *⚡कणकवली ता.२८-: श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. असलदे या संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार गावातील सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.त्यानुसार १३ जागांसाठी १३ संचालक बिनविरोध झाले होते. असलदे रामेश्वर विकास सोसायटी…

Read More

कोईलच्या गणपती मंदिर कलशारोहण सोहळ्यास कलश मिरवणुकीने प्रारंभ

*⚡मालवण ता.२७-:*’एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव असलेल्या मालवण तालुक्यातील कोईल गावच्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन वास्तूचा कलशारोहण सोहळ्यास आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्त मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाची मिरवणूक गावच्या वेशीवरुन वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

Read More

ट्रॉलरवरून पडून खलाशी बेपत्ता

मालवण (प्रतिनिधी) सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्रात श्री देवी केळबाई ट्रॉलरवरील खलाशी महेंद्र दामोदार पालयेकर (३१ रा. मुंबई) हा ट्रॉलरवरून पडून बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ट्रॉलर मालक चिराग मयेकर यांनी खलाशी पालयेकर बेपत्ता झाल्याची खबर मालवण पोलीस स्थानकात दिली. आहे. दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री देवी केळबाई ट्रॉलर सर्जेकोट कवडा रॉकसमोरील समुद्राकडे आला…

Read More

बावशी येथील बचतगटाचे सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

सिंधुदुर्गनगरी ता २७ बावशी येथील रेशनिंग दुकान परवान्याबाबत झालेला अन्यायाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रेशनिंग दुकान परवाना मिळावा या मागणीसाठी जय मल्हार स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या लेखी पत्रानुसार तूर्तास स्थगित केले आहे. तर आता कोकण आयुक्तांकडे…

Read More

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघ आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता २७-: १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी. यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.तर जिल्हाधिकरी यांचे मार्फत मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री व ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात…

Read More

साईक्षा केळजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत

*⚡सावंतवाडी ता.२७-:* मातोंड येथील साईक्षा केळजी हिची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. पुणे येथील अमर एकाड यूट्यूब चॅनेलच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी साईक्षाने आपले वक्तृत्व ऑनलाईन पद्धतीने सादर केले होते. तिचे वक्तृत्व आयोजक व देशभरातील श्रोत्यांना आवडले असून तिची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथील बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे…

Read More

डॉ. विशाल पाटील यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव’ पुरस्कार

सावंतवाडी : शहरातील डॉ. विशाल पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग उत्तमरीतीने केल्याबद्दल त्यांना ‘इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला, साहित्य व सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन २०२१’ मध्ये ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१’ देऊन गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘अण्णा’ माधव अभ्यकंर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात…

Read More
You cannot copy content of this page