बावशी येथील बचतगटाचे सहाव्या दिवशी उपोषण स्थगित

सिंधुदुर्गनगरी ता २७ बावशी येथील रेशनिंग दुकान परवान्याबाबत झालेला अन्यायाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रेशनिंग दुकान परवाना मिळावा या मागणीसाठी जय मल्हार स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या लेखी पत्रानुसार तूर्तास स्थगित केले आहे.

तर आता कोकण आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या पाठपुराव्याने मंजूर झालेले बावशी गावातील रेशनिंग दुकान बचत गटाला न देता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला असून या विरोधात आणि आपल्याला रेशनिंग दुकान परवाना मिळावा यासाठी जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल मल्हार स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. यावेळी बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता सुषमा सावंत यांच्यासह अन्य महिलांनी उपोषनात सहभाग घेतला आहे. बावशी येथील जय मल्हार स्वयं सहायता महिला बचत गटामार्फत बावशी गावाला स्वतंत्र रेशनिंग दुकान मिळावे, यासाठी गेल्या वर्षी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सुपूर्द केला होता. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता नाही. तसेच इतर भागातील लोकांना दूर जावं लागणार म्हणून पुरवठा विभागाने दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते. परंतु या दोन ते तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. तसेच बचत गटाच्या महिलाही कोरोना बाधीत होत्या. यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान परवाना रद्द केला आहे. मात्र बावशी गावाला मंजूर झालेले रेशन दुकान एका पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला आहे. असे करून प्रशासन महिला बचत गटाच्या महिलांचा रोजगार काढून घेत आहे. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी २२ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

आज याबाबत निवासी उप जिल्हाधिकारी दत्तात्रय भड़कवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी याबाबत कोकण आयुक्त यांच्याकडे दाद मागावी. अन्यथा नव्याने जाहिरनामा काढला जाइल,तेव्हा प्रस्ताव करावा.या लेखी पत्रानुसार आज सहाव्या दिवशी उपोषण तुर्तास स्थगित केले.

You cannot copy content of this page