जिल्ह्यातील भाजपा अंतर्गत घडामोडींना वेग

कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

*⚡कणकवली ता.२८-:* शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नीतेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे.यापार्श्वभूमीवर कणकवलीत राजकीय नाट्य घडामोडी घडत आहेत. त्यामुळे कणकवली शहरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून सुनावणीकडे राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीसह जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे हल्ल्याप्रकरणावरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला असून राजकीय घडामोडीही घडत आहेत. या घडामोडींना जिल्हा बँकेच्या निवडणुकीची किनार असल्याचे पहावयास मिळते. केंद्रीय मंत्री नारायण राणे काल रात्री अचानक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.यामुळे भाजपा अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर प्रहार भवन येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक होत असून या बैठकीत नाम.नारायण राणे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कणकवलीत चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा असून सर्वसामान्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page