साईक्षा केळजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत

*⚡सावंतवाडी ता.२७-:* मातोंड येथील साईक्षा केळजी हिची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. पुणे येथील अमर एकाड यूट्यूब चॅनेलच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी साईक्षाने आपले वक्तृत्व ऑनलाईन पद्धतीने सादर केले होते. तिचे वक्तृत्व आयोजक व देशभरातील श्रोत्यांना आवडले असून तिची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे येथील बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे २ जानेवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय अंतिम फेरी होणार आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ‘महिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम कशा बनू शकतात?’ या विषयावर साईक्षा केळजी आपले वक्तृत्व सादर करणार आहे. साईक्षाने आजपर्यंत अनेक स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यापूर्वीही तिची अनेक स्पर्धांमध्ये निवड झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page