सावंतवाडी : शहरातील डॉ. विशाल पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग उत्तमरीतीने केल्याबद्दल त्यांना ‘इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला, साहित्य व सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन २०२१’ मध्ये ‘महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१’ देऊन गौरविण्यात आले.
सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘अण्णा’ माधव अभ्यकंर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विशाल पाटील यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नेत्र तपासणी शिबीरांमध्ये वैद्यकीय सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा सामाजिक क्षेत्रात त्यांनी उत्तमरित्या वापर केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
