Headlines

डाक सेवकांचा २८, २९ ला देशव्यापी संप

ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सहभागाचे आवाहन ओरोस ता.१७-:* विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ व २९ मार्च या कालावधीत पुकारलेल्या देशव्यापी संपात ज़िल्ह्यातील डाक सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्गच्यावतीने केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार विभागीय पातळीवर धरणे आंदोलन…

Read More

खडी क्रशर मशीनची वाहतूक करताना वीजवाहिन्या तुटून घरगुती उपकरणांचे नुकसान…

ग्रामस्थ आक्रमक; क्रशर मशीनसह वाहतूक करणारे वाहन नागरिकाने धरले रोखून दोडामार्ग ता.१७-:* शिरंगे बुडीत क्षेत्रात एका दगड खाणीवर चेन असलेला खडी क्रशर मशिन नेण्यात आली होती.ही मशिन बुधवारी रात्री उशिरा एका मोठ्या वाहनात भरुन ती दोडामार्ग येथे नेली जात असताना साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये वीज वाहिन्या खाली आहेत त्यामुळे.खडी क्रशर मशिन नेते वेळी लाकडी बांबू…

Read More

आंबा-काजू नुकसानीचा तातडीने पंचनामा करा

तुळस येथील बागायतदानांची मागणी वेंगुर्ला ता.१६-:* गेले चार ते पाच दिवस बदलत असलेले हवामान, धुळीचे वादळ तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा अशी मागणी तुळस येथील आंबा-काजू तसेच भातपिक शेतक-यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे लेखी निवदेनाद्वारे केली आहे. नोव्हेंबर महिन्यात सतत तीन ते चार दिवस पडलेल्या…

Read More

पार्सेकर दशावतार मंडळाचे तिस-या पिढीचे वारसदार गौरव पार्सेकर यांचा वांद्रेश्वर मंडळातर्फे सत्कार

वेंगुर्ला ता.१७-:* वेंगुर्ला येथील प्रसिद्ध पार्सेकर दशावतार कंपनीच्या तिस-या पिढीचे वारसदार गौरव प्रभाकर पार्सेकर यांचा श्री देव वांद्रेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव १६ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीसत्यनारायणाची महापूजा तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘पृथ्वी शापित पार्वती‘ हा विशेष नाट्यप्रयोग सादर झाला….

Read More

काथ्या संस्थेच्या चेअरमनपदी माधवी गावडे

वेंगुर्ला ता.१७-:* महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सहकार खात्याचे अधिकारी श्री. कावले यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मार्च रोजी पार पडली. यात वेतोरे येथील माधवी मधुसुदन गावडे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत प्रज्ञा परब या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून तर लिला परब, सोनाली साळगांवकर, श्रृती रेडकर, अनुराधा परब, रंजना कदम, प्रविणा खानोलकर,…

Read More

प्रसूत होणाऱ्या महिलेच्या मदतीला रक्तदाता संघटना आली धावून…

अवघ्या एका तासात १० रक्तदाते करून दिले उपलब्ध; देव्या सुर्याजीचा पुढाकार सावंतवाडी ता.१७-:* उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका रुग्णांला तातडीनं ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. या रक्तगटाच्या १० रक्त पिशव्यांची गरज असताना युवा‌ रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून एका तासात १० रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आल. काही दिवसांपूर्वी येथील तृटींमुळे ह्या ब्लड बँकमधून रक्त देण्यास अथवा घेण्यास मनाई…

Read More

सुवार्डा डोंगराच्या शिखरावर पहिली होळी उभारुन मळगाव गावच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जपत आहेत असंख्य वर्षांची परंपरा सावंतवाडी दि.१७-:* मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर आज मळगाव गावची पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. असंख्य वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगाव गावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जपत आले आहे. मळगाव गावातील मानाच्या होळीसाहीत सर्व…

Read More

सविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन निलेश राणेंचा वाढदिवस साजरा…

सावंतवाडी भाजपकडून राबवण्यात आला उपक्रम सावंतवाडी ता.१७-:* भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथिल जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमला जीवनावश्यक वस्तू भेट देत सावंतवाडी भाजपकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. १८२ अनाथ, अपंग आसरा घेत असून त्यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी सरचिटणीस मंदार नार्वेकर, माजी सभापती अँड….

Read More

सावंतवाडी भाजप कडून निलेश राणेंना कुडाळ येथे वाढदिवसाच्या देण्यात आल्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१७-:भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी निलेश राणे यांची कुडाळ येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून विविध उपक्रम राबवले जाणार असून, यावेळी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

कोकणचा ‘बेधडक’ युवानेता

माजी खासदार निलेश राणे सिंधुदुर्ग दि.१७-: बेधडक वक्तव्य, आकर्षक आणि तितकेच आक्रमक व्यक्तिमत्व यामुळे युवा वर्गासाठी ‘आयडॉल’ बनलेले माजी खासदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे समाजकारणात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या या युवानेत्याचा आज वाढदिवस… निलेश राणे यांचा जनसंपर्क दांडगा आहे, तसेच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर देखील त्यांना मान आहे त्यामुळे…

Read More
You cannot copy content of this page