ग्रामस्थ आक्रमक; क्रशर मशीनसह वाहतूक करणारे वाहन नागरिकाने धरले रोखून
दोडामार्ग ता.१७-:* शिरंगे बुडीत क्षेत्रात एका दगड खाणीवर चेन असलेला खडी क्रशर मशिन नेण्यात आली होती.ही मशिन बुधवारी रात्री उशिरा एका मोठ्या वाहनात भरुन ती दोडामार्ग येथे नेली जात असताना साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये वीज वाहिन्या खाली आहेत त्यामुळे.खडी क्रशर मशिन नेते वेळी लाकडी बांबू घेऊन ते वर न उचलता मधूधुंद चालकाने तसेच पुढे जात असताना साटेली भेडशी बाजारपेठ केबल व वीज वाहिन्या ओढल्या गेल्या आणि त्या एकमेकांना चिकटून मोठ्या प्रमाणात पार्क होऊन अनेकांच्या घरातील उपकरणे जळाली वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संतापलेल्या भेडशी येथील नागरिकांनी हे वाहन रोखून धरुन नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत सोडणार नाही असा प्रविञा घेत वाहन खडी क्रशर सह रोखून ठेवले.हे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले पण संतापलेल्या नागरीकांना समजूत काढणे हे प्रयत्न निष्फळ ठरले.
दोडामार्ग ते विजघर मार्गावर साटेली भेडशी बाजारपेठ बुधवारी रात्री उशिरा पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास शिरंगे बोडण येथून कोनाळकट्टा यांञिकी वसाहत ते दोडामार्ग अशी वाहतूक करण्यासाठी चेन असलेला खडी क्रशर मशिन वाहनात भरुन जात असताना साटेली भेडशी मधला बाजारपेठेत मध्ये वर असलेल्या वीज वाहिन्या टेलिफोन केबल,टि. व्ही. केबल, आहे.ते क्रशर मशिन याला लागणार याची जाणीव असताना मधूधुंद चालकाने सोबत असलेल्या इसमाला काठी हुक लावून ते वर न उचलता तसाच पुढे वेगाने आला त्यामुळे केबल टीव्ही टेलिफोन केबल वीज वाहिन्या अडकून ओढल्या गेल्या आणि अवघ्या काही सेकंदात वीज वाहिन्या एकञ चिकटून मोठा पार्क होऊन ठिगंणी उडाली आणि अनेकांच्या घरातील टि व्ही, फॅन,एअरकुलर,आदी जळून गेल्या आणि वीज पुरवठा झाला.
