ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सहभागाचे आवाहन
ओरोस ता.१७-:* विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ व २९ मार्च या कालावधीत पुकारलेल्या देशव्यापी संपात ज़िल्ह्यातील डाक सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्गच्यावतीने केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार विभागीय पातळीवर धरणे आंदोलन डाक अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे बुधवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत केले होते.
सर्व डाक सेवकांना प्रमोशन मिळावे, कर्मचारी वर्गाला विमा संरक्षण मिळावे, सर्व कर्मचारी वर्गाला १० लाख ग्रॅज्यऐटी मिळण्यासाठी टपाल खात्याचे खासगीकरण थांबवणे,१८० दिवसाची रजा रोखीने मिळावी, कामगार विरोधी कायदा रद्द करावा, नवीन पेशन रद्द करून जुनी पेशन्स मिळावी, कर्मचारी वर्गाची पिळवणूक थांबवावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या आंदोलनात जील्हातील ५० डाक सेवकांनी सहभाग घेतला. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष हरियान, सचिव तुकाराम बाळकृष्ण गावडे, तसेच माजी अध्यक्ष अभिमन्यू धुरी, माजी सचिव जगन्नाथ मोडक, दिलीप गावडे, मनोहर गावडे, भास्कर परब, दशरथ पेडणेकर, उदय गावडे, ज्ञानेश्वर आइर, अनिल कुलकर्णी, महादेव धुरी, श्री शशिकांत धुरी, श्री राजन तेंडुलकर, श्री वासुदेव करंदीकर, श्री सुनील पवार, श्री राजेश ठाकूर, श्री श्यामसुंदर घाडीगावकर, श्री संजय होडवडेकर, श्री तुळशीदास नाईक, श्री मंगेश गावडे, श्री दिलीप मुळये, श्री गणेश भुसेकर, सौ भारती नाईक, श्रीमती नीता बांदिवडेकर, श्री पांडुरंग मिशाल, श्री सत्यविजय ठवण, श्री निलेश पास्ते, श्री रविकांत सावंत, श्री मुकेश पालव, श्री मिशाल, श्री दया अनावकर, कु अजित जाधव, कु अर्जुन नाईक, श्री सूर्यकांत साठम, श्री दिपक जाधव आदी जिल्हातील डाक सेवक उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सचिव श्री तुकाराम गावडे ह्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच देशव्यापी संपात सहभागी होण्याचे केले.
