वेंगुर्ला ता.१७-:* महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सहकार खात्याचे अधिकारी श्री. कावले यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मार्च रोजी पार पडली. यात वेतोरे येथील माधवी मधुसुदन गावडे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत प्रज्ञा परब या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून तर लिला परब, सोनाली साळगांवकर, श्रृती रेडकर, अनुराधा परब, रंजना कदम, प्रविणा खानोलकर, रक्षिता गोवेकर, छाया भाईप यांचा संचालक म्हणून समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांना काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देताना रत्नागिरी जिल्ह्यातही काथ्या उद्योगासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन चेअरमन माधवी गावडे यांनी सांगितले.
