सविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन निलेश राणेंचा वाढदिवस साजरा…

सावंतवाडी भाजपकडून राबवण्यात आला उपक्रम

सावंतवाडी ता.१७-:* भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथिल जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमला जीवनावश्यक वस्तू भेट देत सावंतवाडी भाजपकडून वाढदिवस साजरा करण्यात आला. १८२ अनाथ, अपंग आसरा घेत असून त्यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

यावेळी सरचिटणीस मंदार नार्वेकर, माजी सभापती अँड. परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, माजी पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, दिलीप भालेकर, मिसबा शेख, संजू शिरोडकर, शंभू विर्नोडकर, योगेश प्रभू, अमित गवंडळकर आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page