Headlines

शक्तीपीठ च्या नव्या आराखड्यामुळे व्यपार व पर्यटन धोक्यात …

ठाकरेसेना शिवसेना स्टाईलने संघर्ष करणार:माजी आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद.. कुडाळ : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे कोकणच्या व्यापार आणि पर्यटनाचे कंबरडे मोडणार असून, हा प्रकल्प कोकणवासीयांच्या हिताचा नसेल तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक यांनी आज सायंकाळी उशिरा कुडाळ…

Read Full News

केवळ एनसी नको, तर संशयितांवर कठोर कलमान्वये एफआयआर दाखल करा !

कुडाळ कचरा डेपो आग प्रकरणी आमदार निलेश राणेंचे पोलिसांना निर्देश.. कुडाळ : कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CO) श्री. औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. दरम्यान, ही आग लावली गेली असल्याच्या संशयावरून केवळ ‘एनसी’…

Read Full News

कणकवलीत १८ एप्रिल ला शिक्षण सेवकांच्या प्रश्नांवर कॅण्डल मार्च व आदरांजली सभा…

कणकवली : आयनल (ता. कणकवली) येथील शिक्षणसेवक स्व. प्रशांत गंगाराम तांबे तसेच राज्यातील मृत शिक्षणसेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिक्षणसेवक कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली येथे कॅण्डल मार्च व आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षणसेवक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले…

Read Full News

प्राची इस्वलकर यांची जि.प. समाजकल्याण व शिक्षण समितीवर निवड…

कणकवली : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित जि.प. सदस्या प्राची देवानंद इस्वलकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण या दोन महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजप व शिवसेना यांची सत्ता असून अध्यक्ष, उपाध्यक्ष…

Read Full News

डिगस हायस्कूल जवळ जाणारा रस्ता अडवला…

नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.. सिंधुदुर्गनगरी ता १६कुडाळ तालुक्यातील डीगस घाण्याचीवाडी, सोनारगाळी ते डीगस हायस्कूल (रस्ता क्रमांक २३)वर काही व्यक्तीकडून अनधिकृत पणे निस (अडथळा) मारून रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,गंभीर रुग्ण, आणि वाडीतील ग्रामस्थांचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी हा मार्ग तात्काळ खुला करावा. या मागणीसाठी डीगस ग्रामस्थांनी…

Read Full News

काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष स्थानिकांच्या मतांवर आधारित निवड होणार…

जिल्हा निरीक्षक दानिश अब्रार.. सिंधुदुर्गनगरी ता १६काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसकडून राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्ह्यात व्यापक पातळीवर संवाद व बैठका घेतल्या जाणार असून, जिल्हाध्यक्ष निवडही स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा जिल्हा निरीक्षक दानिश अब्रार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार…

Read Full News

कणकवलीत उद्या दिव्यांग व पेन्शन धारकांसाठी विशेष शिबिर…

शिबिरात मिळणार पेंशन धारकांना उत्पन्नाचे दाखले.. ⚡कणकवली ता.१६-:दिव्यांग व्यक्ती तसेच विविध पेन्शन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी हयात दाखला भरणे आणि उत्पन्न दाखले काढून देण्यासाठी कणकवली तहसीलदार कार्यालयात उद्या (१७ एप्रिल) रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींसह इतर पेंशन लाभार्थ्यांचे उत्पन्न दाखले तयार करून दिले जाणार आहेत. त्यामुळे संबंधितांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,…

Read Full News

तेंडोलीत १९ पासून श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा…

कुडाळ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल याकालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १९ रोजी सकाळी ७ वाजता देवतावंदन, पुण्याहवाचन, अग्नीस्थापन, ग्रहयज्ञ, ऋग्वेद शाकल संहिता स्वाहाकारारंभ, ७.३० वाजता श्री देव रवळनाथ चरणी दररोज ऋग्वेदसंहिता अभिषेक पूजा,यज्ञमंडप वास्तुयजन, गणपती लघुरुद्र, दुपारी १ वाजता…

Read Full News

कुडाळ मध्ये १८ रोजी महानाट्य ‘शिवराज भूषण’…

मालवण-कुडाळच्या ८० कलाकारांच्या संचात :इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा श्री शिवराज मंचचा प्रयत्न.. कुडाळ : शिव छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका, जाज्वल्य आणि वैभवशाली पराक्रम हिंदुस्थानभर पोहोचविण्याचे काम केले ते कवी भूषण यांनी. यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य रंगमंचावर आणले आहे. या महानाट्याचा प्रयोग शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी…

Read Full News

मठ मठकरवाडी मुख्य मार्गांवर धोकादायक स्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांना धोका ..

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांनजिक अंडरग्राउंड विजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. परंतु मठ गावातील मठकरवाडी येथे पुलानजिक भराव खचला असून यामुळे वाहनधारकास धोका पोहचत आहे. साईडपट्टीच अस्तित्वात नसल्याने येथून प्राथमिक शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना धोका उत्पन्न होत आहे. येथील पुलाच्या कठड्याकडे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाळी हंगामात स्थिती गंभीर होऊन अपघात होण्याची…

Read Full News

You cannot copy content of this page