Headlines

मनसे आपल्या पद्धतीने आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफीस भाग पाडेल

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे .सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पाडेल…

Read More

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक

भाजपाचे आम. नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात कणकवली ता.२६-:* जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा  करून फसवणुकीचा  नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी घणाघातील टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली….

Read More

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे अमित सामंत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पाठपुरावा कणकवली ता.२६-:* नवीन कुर्ली गावातील राष्ट्रवादीच्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढणे, स्ट्रीट लाईट रस्त्याची साफसफाई अशा विविध कामाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नारळ फोडून मारुती मंदिर नवीन शुभारंभ कुर्ली येथे करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा…

Read More

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कथालेखक शरद काळे यांचे निधन

कणकवली ता.२६-:* कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, निष्ठावंत शिक्षक आणि खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद काळे ( 82) यांचे 26 मे रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोकणच्या साहित्य चळवळीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मूळ वाडा-पडेल येथील असलेले शरद काळे हे नोकरीच्या निमित्ताने खारेपाटण येथे आले आणि तिथेच स्थायिक…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी ता.२६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय,…

Read More

वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षकपदी मनोज उर्फ बापू सावंत

वैभववाडी ता.२६-:* कणकवली पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक तथा माजी सभापती दिलीप तळेकर व मनोज रावराणे यांचे स्वीय सहाय्यक मनोज उर्फ बापू सावंत यांची वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षक पदी वैभववाडी येथे पदोन्नती झाली आहे. गेले 8 वर्ष पं स कणकवली येथे सभापती यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मनोज उर्फ बापू सावंत हे काम पाहत होते. त्या आधी…

Read More

देवबागवासीयच राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील

आमदार वैभव नाईक यांचा घणाघात मालवण ता.२६-:* निलेश राणेंनी आमच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता वर्कऑर्डर नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी करून देवबाग वासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील अशी खोचक टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. नारायण…

Read More

जाहीर खान, वासिम पडवेकर यांचा काँग्रेस प्रवेश

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश सावंतवाडी ता.२६-:* बाहेरचावाडा येथील जाहीर खान, वासिम पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश केला.आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश असून येत्या काळात शहरात कॉंग्रेसचे हात अधिक बळकट होतील असा विश्वास महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ…

Read More

भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रॉनद्वारे सिटी सर्वेक्षण…

बांदा ता.२६-:* भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण करण्यात आले. तीन टप्प्यात १७७ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर शहरातील सातबारा बंद होणार असून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. बांदा शहराचे १९८७ मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. शहराचे विस्तारिकरण झाल्याने गावठाण क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या…

Read More

तारकर्ली बोट दुर्घटनेप्रकरणी सात जणांची जामिनावर सुटका

मालवण ता.२६-:* तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस व इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह सात जणांवर काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या सातही जणांना पोलीसांनी अटक केली. या सात जणांना…

Read More
You cannot copy content of this page