मनसे आपल्या पद्धतीने आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफीस भाग पाडेल

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे .सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पाडेल असे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी सांगितले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपकर बोलत होते.यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, या जिल्ह्यातील आमदार-खासदार पालकमंत्री गप्पगार का?या साऱ्याना मलिदा मिळाला का ?अशी शंका उपस्थित होत आहे ही टोल वसुली बंद पाडून हे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील जनतेला दिलासा देतील का? असा सवालही श्री.उपरकर यांनी केली आहे महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू केली जात आहे. गुरुवारी सुरु असलेली ट्रायल आम्ही बंद करण्यास भाग पाडले. टोल नाक्यावर कोणत्याही सुविधा नाहीत. वर्क ऑर्डरमध्ये तारखेचा उल्लेख नाही. जिल्हावसियाना टोलमुक्ती हवीच. मात्र हे सारे घडत असताना लोकप्रतिनिधी काय करताहेत? त्यांना मलिदा मिळातोय का? असा सवाल करत जिल्हावासियानी टोल बंदसाठी पक्षभेद विसरून आंदोलन करण्याची गरज असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. जिल्हावासियाना आम्ही आवाहन केले आहे. पण कुणा सत्ताधाऱ्यांना यात सहभागी व्हायचे नसेल तर मनसे योग्य पद्धतीने आंदोलन छेडेल असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

ओसरगाव येथे टोलवसुली सुरू करण्याचे पत्रक गुरुवारी वाटण्यात येत होते. कोणत्याही प्रकारे वृत्तपत्रात जाहिरात न देता टोलवसुली करण्याचा घाट घातला जात आहे. टोल नाक्यावर टॉयलेटची सुविधाही नाही. ज्या कंपनीकडून ही टोल वसुली केली जाणार आहे त्या कंपनीकडे वर्कऑर्डरही नाही. जी वर्कऑर्डर देण्यात आली आहे त्यावर कधीपासून कधीपर्यंत सुरू करावयाचा आहे याचा उल्लेखही नाही.

तसेच कोणत्या गाडी कडून किती रक्कम द्यावयाची आहे याची माहितीही लावण्यात आलेली नाही. टोलचे जे दांडे आज पाडले जात होते ते काही वाहनांवरही पडले. कोल्हापूर येथे अशाप्रकारे अनधिकृतपणे सुरू असलेली टोल वसुली कारवाई बंद करण्यास भाग पाडले. एकीकडे महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. कणकवली मधील उड्डाणपुलाचे कामही निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अद्याप महामार्गाचे 45 कोटींचे काम बाकी आहे अशा परिस्थितीत टोल वसुलीची घाई का केली जात आहे.

नांदगावमधील पूर्ण कामाबाबत नुकतेच उपोषणही झाले. अशा स्थितीत टोलवसुली सुरू करणे अयोग्य आहे.याबाबत आम्ही कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधला असता त्यांनी 1 जूनपासून टोल सुरू होणार असल्याचे सांगत जाहिरातही देण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र असे असताना अगोदरच पत्रके वाटणे ,उद्यापासून टोल वसुली कशी केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील टोल तेथील जनतेने बंद पाडण्यास भाग पाडले.

त्याप्रमाणे सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठऊन जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पडेल असेही श्री उपकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page