तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
सावंतवाडी ता.२६-:* बाहेरचावाडा येथील जाहीर खान, वासिम पडवेकर यांनी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या माध्यमातून कॉंग्रसमध्ये प्रवेश केला.आगामी न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश असून येत्या काळात शहरात कॉंग्रेसचे हात अधिक बळकट होतील असा विश्वास महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ नेते विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दिलीप नार्वेकर, अशोक राऊळ, रविंद्र म्हापसेकर, रुपेश आईर, गुरु आईर, विजय कदम, विभावरी सुकी, असलम खतब, समीर वंजारी, संजय राऊळ, माया चिटणीस, अभय मालवणकर, अरुण भिसे आदि उपस्थित होते.
