Headlines

खरारे पेंडूर गावात गवारेड्यांची दहशत…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील खरारे- पेंडूर गावात गवा रेड्यांची दहशत पाहायला मिळत आहे. गवारेड्यांचे कळपच्या कळप दिवसा ढवळ्या रस्त्यावरून फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येथील काही ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर मालवण कट्टा येथील वनपालांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी खरारे पेंडूर भागातील वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त…

Read More

मालवण पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत २८ रोजी तहसीलदार कार्यालयात…

तहसीलदार अजय पाटणे यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडत चा कार्यक्रम जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मालवण तहसीलदार कार्यालय येथे मालवण पंचायत समिती निवडणुकी साठी आरक्षण सोडतीसाठी सभा होणार आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे…

Read More

गांजा बाळगल्याप्रकरणी दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता…

मालवण (प्रतिनिधी) तीन वर्षांपूर्वी गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नांदरुख येथील दिवेश शरद गावडे व समीर सुरेश गावडे या दोन्ही आरोपींची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.अमित पालव, ऍड. उल्हास कुळकर्णी, ऍड. प्राची कुळकर्णी, ऍड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले. दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मालवण तालुक्यातील नांदरुख गावाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत…

Read More

रोटरीचे क्लबचे उपक्रम कौतुकास्पद

प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे वैभववाडी संजय शेळकेरोटरी क्लबचे उपक्रम हे कौतुकास्पद असतात. वैभववाडी तालुक्यातील पहिला कार्यक्रम रोटरी क्लब वैभववाडीचा करण्याचा योग आला ही बाब माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक धोत्रे सर यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये असताना…

Read More

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणातल्या प्रतिभावंताचा गौरव,

वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांचा कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मान ⚡मालवण ता.२६-: कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्यासह देवाक काळजी ह्या गाण्याचे संगीतकार विजय गवंडे यांना गौरवण्यात आले. कोकणातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते. कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

Read More

सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल शहिदांना श्रद्धांजली

⚡आंबोली ता.२६-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कारगिल युद्धातील शुर सैनिक व वीरगती प्राप्त शहिदांना विविध युद्धचित्रे, चित्रकला, युद्धकथा याद्वारे…

Read More

‘भारतीय संशोधक’ पुस्तकातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल – सुरेश ठाकूर

⚡मालवण ता.२६-: केंद्रशाळा मसुरे नं.१ चे शिक्षक व साने गुरुजी कथामाला मालवणचे सदस्य श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन कथामाला मालवण व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय संशोधकांची छोटी चरित्रे वाचून मुलांना भविष्यात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. या पुस्तकामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण…

Read More

दहावीतील संस्कृत विषयातील गुणवंतांना शिष्यवृत्ती

⚡मालवण ता.२६-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीपासून दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी रू. १० हजार एवढी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यावर्षी संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन या विषयात कु. तन्वी गणपत…

Read More

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यात
झाली बाचाबाची;

एकाला दिला चोप कणकवली: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे बाचाबाची झाली. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.यावेळी शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच यावर पडदाही पडला मात्र या प्रकारची चर्चा रंगली होती. शिवसेनेतले हे दोन गट नव्हेत ना? अशी चर्चा होत होती. कणकवली येथे घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शिवसेनेचे…

Read More

गटातटाचे राजकारण करून खास. विनायक राऊत यांनी शिवसेनेची वाताहत केली

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची टीका ⚡कणकवली ता.२६-: खास.विनायक राऊत यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या गटामुळे सेनेचेच नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण सेनेत राहतील आणि कोण उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटात सामील होतील हे लवकरच समजेल. जे निष्ठावान सेनेत…

Read More
You cannot copy content of this page