गांजा बाळगल्याप्रकरणी दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता…

मालवण (प्रतिनिधी)

तीन वर्षांपूर्वी गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नांदरुख येथील दिवेश शरद गावडे व समीर सुरेश गावडे या दोन्ही आरोपींची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.अमित पालव, ऍड. उल्हास कुळकर्णी, ऍड. प्राची कुळकर्णी, ऍड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.

दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मालवण तालुक्यातील नांदरुख गावाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीसांना गांजा ओढणाऱ्या मुलांबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदरुख गिरोबा मंदिराच्या बाजुला छापा टाकला असता त्या ठिकाणी दिवेश शरद गावडे व अन्य दोन अल्पवयीन मुले आळीपाळीने त्यांचे हातातील चिलीम ओढताना दिसले. म्हणुन पोलीसांनी त्याचे हातातील चिलीमची तपासणी करत चिलीम मध्ये गांजा असल्याची खात्री केल्यानंतर तिन्ही मुलांच्या अंगझडतीमध्ये गांजाच्या पुड्या मिळुन आल्या. मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी देवळाच्या समोर गडग्यावर बसलेल्या आरोपी समीर सुरेश गावडे याच्याकडुन गांजा खरेदी केल्याचे सांगितल्याने पोलीसांनी समीर गावडे याच्यावर छापा टाकुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देखील ५ ग्रॅम गांजा मिळुन आला होता. त्यामुळे म्हणुन आरोपी दिवेश शरद गावडे व समीर सुरेश गावडे यांच्या विरुध्द गांजा बाळगल्याप्रकरणी फिर्यादीने गुंगीकारक औषधी द्रव्य अधिनीयम व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम कलम ८ (क) सह ३४ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. या खटल्याची सुनावणी मालवण न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर होवुन फिर्यादी व त्यांचे साक्षीदार यांचे साक्षीतील विसंगती व आरोपीच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद विचारात घेवुन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी दिवेश गावडे याच्या तर्फे ऍड. अमीत पालव व आरोपी समीर गावडे याच्यातर्फे ऍड. उल्हास कुळकर्णी, ऍड. प्राची कुळकर्णी व ऍड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page