प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे
वैभववाडी संजय शेळके
रोटरी क्लबचे उपक्रम हे कौतुकास्पद असतात. वैभववाडी तालुक्यातील पहिला कार्यक्रम रोटरी क्लब वैभववाडीचा करण्याचा योग आला ही बाब माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक धोत्रे सर यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये असताना कोरोना काळात रोटरीचे कार्य मी जवळून पाहिले आहे त्यामुळे रोटरी बद्दल मला विशेष अभिमान आहे.
वैभववाडी रोटरी क्लब शैक्षणिक बाबींकडे लक्ष पुरवतो आहे शाळांना मदत करतो आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रेसिडेंट संतोष टक्के यांनी रोटरी क्लब वैभववाडीने गेले सहा महिन्यात केलेल्या कामाची माहिती दिली व वैभववाडी तालुक्यातील विविध शाळांतील 200 गरजू विद्यार्थ्यांना क्लब मार्फत मोफत छत्री वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी रोटरी क्लब ने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छत्री देण्याचे कार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, उपशिक्षणाधिकारी शेरलेकर, गटशिक्षणाधिकारी शिनगारे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के, सेक्रेटरी संजय रावराणे, ट्रेझरर प्रशांत गुळेकर, सदस्य प्रा डॉ गवळी, सचिन रावराणे, मनोज सावंत, गंगाधर केळकर, प्रशांत कुळये, सलोनी टक्के, श्रिया धावले, सूर्यकांत धावले, मुकुंद रावराणे, केंद्रप्रमुख श्री. जाधव, दत्त विद्या मंदिर वैभववाडी च्या मुख्याध्यापिका सौ पाटील, सहशिक्षक श्रीमती सावंत, सौ साठे, श्री पाडदेवार व पालक उपस्थित होते.
.
