मालवण पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत २८ रोजी तहसीलदार कार्यालयात…

तहसीलदार अजय पाटणे यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडत चा कार्यक्रम जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मालवण तहसीलदार कार्यालय येथे मालवण पंचायत समिती निवडणुकी साठी आरक्षण सोडतीसाठी सभा होणार आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर दि. २९ जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहीर होणाऱ्या आरक्षणावर दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करावयाच्या आहेत.

You cannot copy content of this page