एकाला दिला चोप
कणकवली: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे बाचाबाची झाली. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.यावेळी शाब्दिक वाद झाला मात्र काही वेळातच यावर पडदाही पडला मात्र या प्रकारची चर्चा रंगली होती. शिवसेनेतले हे दोन गट नव्हेत ना? अशी चर्चा होत होती.
कणकवली येथे घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शिवसेनेचे कार्यकर्ते आज बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले होते.यावेळी शाब्दिक वाद झाला, त्यानंतर तीन जणांनी मिळून एका कार्यकर्त्याला चोप दिला. ही घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
वादाचे कारण काही जणांनी केलेली पालीवारी असल्याचे समजते. शिवसेना शाखेच्या बाहेरील बाजूस कार्यकर्ते समोरासमोर आले.यावेळी शाब्दिक टोमणेबाजी झाली.त्यानंतर एका कार्यकर्त्याला चोप दिला असल्याचे समजते.
