⚡मालवण ता.२६-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीपासून दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी रू. १० हजार एवढी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
यावर्षी संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन या विषयात कु. तन्वी गणपत चौकेकर (९९.२०%), कु. मानसी निलेश करलकर (९३.४०%) कु. राघव सतिश वझे (९१.५०%) व कु. श्रावणी हेमंत पेडणेकर ( ९०.६०%) या विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड या शिष्यवृत्तीसाठी करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
