Headlines

शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी सिंधुदुर्गातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते जाणार…

शिंदे गटाचे नेते अशोक दळवी यांची माहिती.. सावंतवाडी ता.२९-:विजयादशमीच्या दिवशी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे सिंधुदुर्गचे नेते अशोक दळवी यांनी आज केला आहे.

Read More

कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ कवितासंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन

⚡कणकवली ता.२९-: कवी अजय कांडर लिखित “अजूनही जिवंत आहे गांधी” या हर्मिस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिवशी स. 11 वा. राष्ट्र सेवा दल सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दल पुणे आणि हर्मिस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नामवंत…

Read More

शेती संरक्षक बंदूक परवाने नूतनीकरण करण्यास जिल्हा प्रशासनाचा नकार

शेतकऱ्यांची जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार;शेतकरी संघटनेच्या रणजित सावंत यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा त्रास होत असून, वन्यप्राण्यांपासून आर्थिक तसेच जीवित हानी होत आहे. हे रोखण्यासाठी तसेच आत्मसंरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे बंदूक वापरण्यासाठी परवाने मागितले असता, शेतकरी त्या बंदुकीने वन्य प्राण्यांची शिकार करतील असे सांगत परवाने देत नसल्याचा आरोप यावेळी शेतकरी संघटनेने…

Read More

गोगटे वाळके महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्य पदी डॉ गोविंद काजरेकर

⚡बांदा ता.२८-: येथील गोगटे – वाळके महाविद्यालय , बांदाच्या प्राचार्यपदी डॉ . गोविंद काजरेकर यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली . डॉ . काजरेकर हे याच महाविद्यालयात गेली २७ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी विषयात पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ही आहेत . मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य…

Read More

वजराट येथे गरोदर मातांची तपासणी

⚡वेंगुर्ला ता.२८-: माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून उफद्र वजराट येथे गरोदर मातांची तपासणी करण्यात आली.

Read More

रस्त्यातील खड्डे बुजवून केले सेवाकार्य

⚡वेंगुर्ला ता.२८-: सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल नाका ते भटवाडी येथील रस्त्यावरील खड्डे सिमेंट क्राँक्रिटच्या सहाय्याने बुजविले. यावेळी पिटू सावंत, आदित्य खानोलकर, बाळा गावडे, चिमलो आरावूज, दत्ताराम गावडे, भुषण सावंत, योगेश गोवेकर, सुभाष सोनुर्लेकर, कपिल सावंत, प्रथमेश सावंत, शुभम सावंत, नवनाळा सावंत, आनंद कळेकर, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.

Read More

भाजपातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आले. गावडे, प्रितम सावंत, रवी शिरसाठ, भूषण सारंग, वसंत तांडेल, बाळू प्रभू, संदीप पाटील, तन्मय जोशी, मारुती दोडशनट्टी, अमृत पोतनीस, अमेय धुरी, आकाश साळकर, निखिल गावडे, निलय नाईक, आमरोज आराऊंज, बस्त्याव आराऊज उपस्थित होते.

Read More

रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

⚡वेंगुर्ला ता.२८-: रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभ मिळालेल्या आनंदवाडी येथील लाभार्थ्यांना २८ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

Read More

पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२८ -: हंगामाच्यावेळी पेट्रोल आणि सीएनजीचा तुटवडा भासू न देता तो अखंडपणे चालू ठेऊन रिक्षा व्यावसायीकांना सहकार्य केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे वेंगुर्ला-भटवाडी येथील वरसकर पेट्रोल पंपाचे संचालक विजय वरसकर यांचा व सर्व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

वेंगुर्ला-मठ-सावंतवाडी नविन बसफेरी सुरु

⚡वेंगुर्ले ता.२८-: सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज यांनी केलेला पत्रव्यवहार व भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केलेल्या मागणीनुसार २७ सप्टेंबरपासून वेंगुर्ला आगारातर्फे शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवासी नागरिकांसाठी वेंगुर्ला बस स्थानकावरुन सकाळी ८ वाजता वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी अशी नविन बसफेरी सुरु करण्यात आली आहे. ही बस पुन्हा सावंतवाडी येथून मठमार्गे…

Read More
You cannot copy content of this page