⚡वेंगुर्ला ता.२८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर. वैद्यकीय अधिकारी गृहिता राव, परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तुषार साळगावकर, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, रक्तपेढी अधिकारी आकाश एडके, माजी नगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, माजी नगरसेवक श्रेया मयेकर, पिंटू
गावडे, प्रितम सावंत, रवी शिरसाठ, भूषण सारंग, वसंत तांडेल, बाळू प्रभू, संदीप पाटील, तन्मय जोशी, मारुती दोडशनट्टी, अमृत पोतनीस, अमेय धुरी, आकाश साळकर, निखिल गावडे, निलय नाईक, आमरोज आराऊंज, बस्त्याव आराऊज उपस्थित होते.
