शेतकऱ्यांची जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार;शेतकरी संघटनेच्या रणजित सावंत यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा त्रास होत असून, वन्यप्राण्यांपासून आर्थिक तसेच जीवित हानी होत आहे. हे रोखण्यासाठी तसेच आत्मसंरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे बंदूक वापरण्यासाठी परवाने मागितले असता, शेतकरी त्या बंदुकीने वन्य प्राण्यांची शिकार करतील असे सांगत परवाने देत नसल्याचा आरोप यावेळी शेतकरी संघटनेने केला असून, याबाबत त्यांना आज संघटनेतील सर्वच शेतकरी त्यांना नोटीस देणार असून, यापुढे शेतकऱ्याच्या जितिवतास वन्य प्राण्यांपासून धोका उद्भवलास शेतकरी गप्प बसणार नाही तर उग्र आंदोलन उभारेल असा इशारा संघटनेच्या वतीने रणजित सावंत यांनी दिला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, यापूर्वी दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना बंदूक वापरण्याचे परवाने देण्यात आले होते. परंतु, गेली काही वर्ष हे परवाने देण्यात येत नाही आहेत. अंदाजे बंदूक परवाने नूतनीकरण करण्याचे १६६ अर्ज प्रलंबित आहेत. वारंवार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊनही यावर कारवाई होत नाही आहे. तर मंत्री, खासदार, आमदार यांनी सांगूनही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक ऐकत नाहीत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी त्यांनी बंदूक वापरण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकत नसतील तर, येथील शेतकऱ्यांच्या शेतीस तारेचे कुंपण घालावे, तसेच प्रत्येक गावाला लोकसंख्येनुसार शासनाचे बंदूकधारी द्यावेत, आठवड्यातून एकदाच नुकसानीचा पंचनामा सबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी करून, बांधावरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुपूर्द करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रणजित सावंत, गणेश प्रसाद गवस, विजय पेडणेकर, विवेकानंद नाईक, रवींद्रनाथ गावकर, राजन सावंत, दत्तप्रसाद सावंत, बापू गावकर, बावतीस रोड्रिक्स, परेश सावंत, प्रसाद सावंत, अँड. दिगंबर सावंत,
