गोगटे वाळके महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्य पदी डॉ गोविंद काजरेकर

⚡बांदा ता.२८-: येथील गोगटे – वाळके महाविद्यालय , बांदाच्या प्राचार्यपदी डॉ . गोविंद काजरेकर यांची नियमित प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली . डॉ . काजरेकर हे याच महाविद्यालयात गेली २७ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी विषयात पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ही आहेत . मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर लेखक संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे .

डॉ . काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी व समीक्षक असून त्यांच्या साहित्य निर्मितीला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती पुरस्कारासह एकूण चार राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत . डॉ . काजरेकर मागील तीन वर्षे गोगटे – वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते . आता त्यांची विद्यापीठ व शासन नियुक्त समितीमार्फत निवड होऊन त्यांना प्राचार्यपदी नेमण्यात आले.

त्याविषयी त्यांना विद्यापीठाच्या मान्यतेनुसार संस्थचे अध्यक्ष मा . श्री . डी . बी . वारंग यांनी अधिकृत पत्र दिले . या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ बांदा या संस्थचे उपाध्यक्ष श्री . प्रमोद कामात , सचिव श्री.एस.आर.सावंत , खजिनदार श्री . टी.एन.शेटकर , सहसचिव श्री . डी . एस . पणशीकर , सदस्य श्री . सुभाष मोर्ये , श्री . मंदार कल्याणकर , श्री . प्रेमानंद नाडकर्णी , श्री.शीतल राऊळ तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा – यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page