Headlines

तिलारी प्रकल्पांतर्गत वेंगुर्ला शहरास गरजेनुसारच पाणी घेण्यात येणार….

श्री. दिलीप गिरप ;मरणोत्तर अवयवदान बाबत सर्वांनी फॉर्म भरण्याचे निश्चित..

⚡वेंगुर्ला ता.२८-: तिलारी प्रकल्पांतर्गत वेंगुर्ला शहरास पाणीपुरवठाबाबत न. प. सभेत विस्तृत चर्चा करण्यात आली.
शहरास नागरिकांना भुर्दंड पडू नये या दृष्टीने आवश्यकतेनुसारच तिलारी योजनेमार्फत पाणी घेण्याचे व तेवढीच रक्कम भरण्यात यावी, असा ‘प्राथमिक ठराव’ वेंगुर्ला न. प.सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासकीय जागा शासनाकडून घेण्याबाबत या सभेत विस्तृत चर्चा करण्यात आली.
वेंगुर्ला नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी
उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर,
मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे, उपसभापती रिया केरकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईंणकर, समाजकल्याण समिती सभापती युवराज जाधव, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती सचिन शेट्ये, नगरसेवक संदेश निकम, दाजी परब, सुधीर पालयेकर, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, प्रशांत आपटे, विनय नेरुरकर, नगरसेविका समिधा रेडकर, लीना म्हापणकर, सुमन निकम, आकांक्षा परब, काजल कुबल, शितल आंगचेकर, प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील, स्नेहल शिंदे तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रामघाट येथील स्ट्रीट लाईट मागील बराच कालावधी बंद असल्याने याबाबत नगरसेविका शितल आंगचेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून त्वरित पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी केली. याबाबत तातडीने स्ट्रीटलाईट सुरु करण्याची सूचना नगराध्यक्ष यांनी संबंधितांना केली. रामघाट साईडला घालण्यात आलेले गतिरोधक खूप उंच असल्याने धोकादायक ठरत आहेत, याबाबत समिधा रेडकर यांनी सूचना मांडली. वेंगुर्ला शहरातील न. प. मार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘जापनीज गार्डन’ कडे जाणाऱ्या नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी योग्य बोर्ड लावण्यात यावेत, तसेच निमुजगा एरियात भरपूर प्रमाणात कचरा टाकण्यात आला असून शहराचे सौंदर्य बिघडत आहे, याबाबत त्वरित लक्ष पुरवावे आदी मागण्या उपसभापती रिया केरकर यांनी केली. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सुचित केले, जापनीज गार्डन कडे योग्य ठिकाणी बोर्ड लावण्याबाबत नगराध्यक्ष यांनी सूचना दिल्या. मधुसूदन कालेलकर सभागृह येथील सक्शन व्हॅनबाबत प्रीतम सावंत यांनी सूचना मांडली. सुधीर पालयेकर यांनी कातकरी समाज यांना पुरविण्यात येणाऱ्या विहिरीकडे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता याबाबत सूचना मांडली. श्री गणेश चतुर्थी कालावधीपूर्वी शहरातील व विसर्जन स्थळे आदी ठिकाणी झाडी कटिंग करण्यात यावी, तसेच साकव येथील गणपती विसर्जनासाठी पाणी उपलब्धता कमी असल्याने याबाबत नगरसेवक संदेश निकम यांनी सूचना मांडली. याबाबत झाडी कटिंग साठी टीम नियुक्ती करण्यात आली असून साकव येथे पाणी साठवण बाबत नगराध्यक्ष यांनी सुचना दिल्या. यावेळी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मरणोत्तर अवयवदान बाबत सर्वांनी फॉर्म भरण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी अन्य विषयावर ठराव घेण्यात आले.

You cannot copy content of this page