⚡वेंगुर्ले ता.२८-: सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज व फार्मसी कॉलेज यांनी केलेला पत्रव्यवहार व भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केलेल्या मागणीनुसार २७ सप्टेंबरपासून वेंगुर्ला आगारातर्फे शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांबरोबरच प्रवासी नागरिकांसाठी वेंगुर्ला बस स्थानकावरुन सकाळी ८ वाजता वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी अशी नविन बसफेरी सुरु करण्यात आली आहे. ही बस पुन्हा सावंतवाडी येथून मठमार्गे वेंगुर्ला ९.३० वाजता वेंगुर्ल्यात येणार आहे.
वेंगुर्ला-मठ-सावंतवाडी नविन बसफेरी सुरु
