मालवणचे उत्तम फोंडेकर आणि वेंगुर्ल्याचे अनंत आजगावकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान…

⚡मालवण ता,३१-: मालवण कुंभारमाठचे सुपुत्र उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी मागील तीन वर्षातील हापूस आंब्याचे घेतलेले प्रथम उत्पादन तसेच त्यावर केलेल्या संशोधना बद्दल अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हॉलिवूड यु. एस. ए यांनी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलेली कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट दिनांक २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, कुलसचिव कृषी उच्च आयुक्त आणि…

Read More

रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.३१-: अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत आयोजित सलग १० व्या वर्षी खुल्या चित्रकला स्पर्धेत रूजूल सातोसे, काशिनाथ तेंडोलकर, दिक्षा पालकर तर रंगभरण स्पर्धेमध्ये भार्गवी धुरी व भूमि परूळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धेत मिळून जिल्ह्यातील २८८ पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला. उद्घाटन तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रभानंद सावंत व सरपंच रश्मी परब यांच्या…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुस्करने पटकावला प्रथम क्रमांक…

सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराज कोंडुस्कर, सर्वज वराडकर, कनक काळोजी आणि वेदांगी पटवर्धन यांनी पटकावला. स्पर्धा मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या उद्यानामध्ये पार पडली या स्पर्धेतील विजेत्यांना सन मराठी दूरचित्रवाणीच्या कलाकारांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आलीलहान मुलांच्या…

Read More

लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, धनादेश, गॅस शेगडी वितरण…

⚡वेंगुर्ला ता.३१-: भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत विहित वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे ३० डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे आगमन झाल्यानंतर नगरपरिषदेच्यावतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध योजनांची माहिती व लाभ देणारे स्टॉल उभारले होते तसेच आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. याला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धर्मराज कांबळी, श्रेया…

Read More

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार नाही…

आम. नितेश राणे:महायुतीचे सरकार प्रकल्प पूर्ण करेल आणि देशात आदर्श प्रकल्प होईल.. ⚡कणकवली ता.३१-: कोकणात सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे. असा विश्वास आम. नितेश राणे यांनी जनतेला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलट – सुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त…

Read More

सावंतवाडी मिनी महोत्सवाचा आणखीन एक दिवस वाढीवला

⚡सावंतवाडी ता.३१-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेलया सावंतवाडी मिनी महोत्सव १ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आला आहे . वस्तू आणि खाद्यपदार्थ स्टॉल्स यांवर असलेली प्रचंड गर्दी पाहता नागरिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . सर्वप्रथम दिनांक 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत ठेवण्यात आला होता , परंतु महोत्सवाचा कालावधी १…

Read More

देवबाग हायस्कुलचे स्नेहसंमेलन व सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ…

⚡मालवण ता.३१-: देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ दि. ८ ते १० जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त दि. ८ जानेवारी रोजी सायं. ४ वा. सत्यनारायण महापूजा, ६ वा. सुश्राव्य भजन- सादरकर्ते : रामकृष्ण हरी बाल भंजन सेवा संघ, तेंडोली, ७.३० वा. सुगम संगीत- सादरकर्ते : अष्टपैलू…

Read More

कणकवली येथे उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी व्याख्यान..

⚡कणकवली ता.३१-: कणकवली येथील ‘अखंड लोकमंच’ जिल्हा सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत,साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी लोकशाहीनिष्ठ मूल्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजाभिमुख विचारधारा तळागाळात रुजावी यासाठी वैचारिक क्रांतीची मांडणी करणारी ‘अखंड व्याख्यानमाला’ गेल्यावर्षीपासून अखंड लोकमंच संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे….

Read More

जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता…?

कुडाळातून प्रसाद गावडे, सावंतवादी आशिष सुभेदार, मालवणमधून विनोद सांडव यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’..? ⚡कुडाळ ता.३१-: मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या या प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1जानेवारीपासून
रेशन दुकान बंद आंदोलन…

रुपेश पेडणेकर:विविध प्रलंबित मागण्यांसाठी करणार आंदोलन.. ⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते महासंघामार्फत प्रलंबित विविध मागण्यांसाठी देशभरात 1 जानेवारी २०२४ पासून देशभरात न्यायमागणीसाठी बंद पुकारत असल्याची माहिती रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली. बंद बाबत दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,आयुष्यमान भारत योजनेचे काम धान्य दुकानदार करणार नाहीत. दिवाळी शिधावाटप…

Read More
You cannot copy content of this page