केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून श्री देव मोरेश्वर देवस्थान दांडी येथे हायमास्ट टॉवर…

⚡मालवण ता.१५-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील श्री देव मोरेश्वर देवस्थान दांडी येथे हायमास्ट टॉवर बसवण्यासाठी चार लाख निधी मंजूर झाला.

नागरिकांच्या मागणीनुसार माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, दीपक पाटकर, आबा हडकर, ललित चव्हाण, संतोष ढोके, राजन भगत, यशवंत चांदेरकर, मनीष भगत, रोहित चांदेरकर, हिमेश भगत आदी उपस्थित होते.

फोटो :

श्री देव मोरेश्वर देवस्थान दांडी येथे हायमास्ट टॉवर बसवणे कामाचे भूमिपूजन करताना अशोक तोडणकर, दीपक पाटकर, ललित चव्हाण

You cannot copy content of this page