Headlines

स्वामी समर्थ मंदिराच्या कलाशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२९-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठा येथे त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलाशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.दरम्यान सायंकाळी उशिरा इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला देखील कीर्तन प्रेमींनी मोठी गर्दी उसळून मोठा आनंद लुटला.

Read More

वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसूल आल्याने खळबळ…

सावंतवाडी : वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसूल आल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा मानवी आहे की प्राण्याचा हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत असून उद्या दुपारपर्यंत याच निदान होणार आहे. ही हाडे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.वेत्ये रोडवर असलेल्या एका धाब्या शेजारी हाडांच तुकडे…

Read More

होडावडा कस्तुरबावाडी येथील तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

⚡वेंगुर्ले ता.२८-:वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा कस्तुरबावाडी येथील प्रवीण तुळशीदास होडावडेकर, वय 38 वर्षे या तरुणाने आपल्या राहत्या घराच्या खोलीतील लाकडी बाराला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये तुळशीदास बाबू होडावडेकर, वय 61 वर्षे यांनी म्हटले…

Read More

जिल्ह्यात बसवण्यात येणारे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे…

अँड.संदीप निंबाळकर:लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन आंदोलन उभारणार.. सावंतवाडी ता.२८-: शासनाने प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे धोरण आखले असून लवकरच हे मीटर जिल्ह्यात बसवण्यात येणार आहे हे प्रीपेड मीटरचे धोरण गरीब जनतेवर अन्याय करणारे ठरणार आहे त्यामुळे या शासनाच्या धोरणाला जनतेने संघटितपणे विरोध उभा केला पाहिजे यासाठी लवकरच जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या बैठका घेऊन जन…

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे इंजिनिअरिंग व फार्मसीवर मार्गदर्शन सत्र….

⚡सावंतवाडी ता२८-: येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये ३० मे रोजी सकाळी १० वाजता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती तसेच करिअर…

Read More

कुंपणाच्या तारेत अडकून जखमी झालेल्या कुत्र्याला दिले जीवदान…

⚡मालवण ता.२८-:मालवण शहरातील धुरीवाडा खोतमठ नजीकच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या कुंपणाच्या लोखंडी तारेमध्ये अडकलेल्या एका कुत्र्याच्या पायात तार खोलवर रुतल्याने वेदनेने विव्हळणाऱ्या या कुत्र्याला स्थानिक युवक चेतन खोत तसेच नागरिक आपा मालंडकर यांच्या सतर्कतेमुळे प्राणी मित्र चंद्रवदन कुडाळकर आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दळवी यांच्या प्रयत्नातून या कुत्र्याला तारेतून बाहेर काढून त्याच्या पायावर उपचार करून…

Read More

शंकराचा पुतळा ते वाफोली रस्ता खड्डेमय…

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष: उबाठाच्या अशोक परब यांचा आरोप.. ⚡बांदा ता.२८-: बांदा नॅशनल हायवे ६६ ला लागून असलेल्या शंकराचा पुतळा ते वाफोली रस्त्याचा प्रवास मे महिना संपत आला तरी यंदाही खड्डयातूनच करावा लागला. सदरचा रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाची कोणतीच हालचाल दिसून आली नाही. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभाग फक्त…

Read More

प्रा. नागेश कदम यांच्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या पुस्तकाचे प्रकाशन…

⚡मालवण ता.२८-:मराठी साहित्यात निबंध लेखन करणे हे फार मोठे कौशल्य आहे. निबंध लेखनासाठी वाचन, चिंतन, मनन आणि नियमबद्ध लेखन आवश्यक असते. प्रा. नागेश कदम यांनी आपल्या ‘इये निबंधाचिये नगरी’ या निबंध लेखन संग्रहात खूप मेहनत घेतली आहे. त्यांचे निबंध वाचनाने आजचे विद्यार्थी निबंध स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. म्हणून सदरचे पुस्तक…

Read More

नुकसानीचा अहवाल पाठवला नाही…

मविआच्या शिष्टमंडळाने कृषी अधिकाऱ्यांना विचारला जाब.. ⚡कणकवली ता.२८-: तालुक्यातील काही भागांमध्ये वादळामुळे फळबागायतींचे मोठे नुकसान झाले. फळबागायतींचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात हा अहवाल पाठवला नाही, अशी धक्कादायक बाब महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघडकीस आणली. यासंदर्भात प्रभारी तालुका कृषी…

Read More

कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या कामांच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडे करणार…

परशुराम उपरकर: सर्वगोड यांना पालकमंत्री व मुख्य अभियंता पाठीशी घालत आहेत.. कणकवली : कणकवली रेल्वे स्टेशनच्या शुशोभिकरण कामाचे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपण्यापूर्वी होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अंभियत्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामाचा फटका रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे. कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाच्या केबिनचा दरवाजा उघडा असतो, मात्र, सीसीटीव्ही बंद…

Read More
You cannot copy content of this page